आता एका क्लिकवर मिळणार राज्यातील जिल्ह्यांमधील निर्बंध, त्यांची वर्गवारीची माहिती


मुंबई – राज्यातील कोरोनाची दुसरी लाट आता हळूहळू नियंत्रणात येऊ लागल्यामुळे राज्यात काही दिवसांपूर्वी लावलेले लॉकडाऊनचे निर्बंध आता हळूहळू शिथिल करण्यात येत आहेत. राज्य सरकारने यासाठी जिल्ह्यांच्या कोरोना परिस्थितीप्रमाणे त्यांची वर्गवारी केली आहे. यानुसार प्रत्येक गटातील जिल्ह्यांमध्ये वेगळे निर्बंध आहेत. पण आता या सगळ्याची माहिती एका क्लिकवर मिळणार आहे.

राज्यातील नागरिकांसाठी सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने एक वेबसाईट तयार केली आहे. या वेबसाईटवर नागरिकांना कोरोनासंदर्भात राज्याने केलेल्या उपाययोजना, खबरदारीचे उपाय, राज्य तसंच स्थानिक प्रशासनाने लागू केलेले निर्बंध या सगळ्याविषयीची माहिती या वेबसाईटवर मिळणार आहे. नागरिकांना ही माहिती https://msdmacov19.mahait.org/ या वेबसाईटवर गेल्यावर मिळणार आहे.

या साईटवर राज्यातील जिल्ह्यांची वर्गवारी दिलेली आहे. कोणत्या लेव्हलमध्ये कोणता जिल्हा आहे, त्या जिल्ह्यात स्थानिक प्रशासनाने कोणते निर्बंध लावले आहेत, याबद्दलची माहिती या साईटवर उपलब्ध आहे. त्याचबरोबर राज्यातील ऑक्सिजन बेड्सची संख्या, आठवड्याभरातील ऑक्सिजनची स्थिती याबद्दलही माहिती मिळते. त्याचबरोबर ही माहिती दर आठवड्याला अपडेट होत राहते.