उसेन बोल्टच्या जुळ्या मुलांच्या नावावरुन सोशल मीडियात रंगली चर्चा

रविवारी जमैकाचा ऑलिम्पिक व विश्वविजेता धावपटू उसेन बोल्ट आणि त्याची पार्टनर केसी बेनेट यांनी जुळ्या मुलांच्या जन्माची माहिती जाहीर केली. विशेष म्हणजे या पैकी एका मुलाचे नावं थंडर बोल्ट असून दुसऱ्याचे नाव सेंट लिओ बोल्ट असे ठेवण्यात आले आहे.

सोशल नेटवर्किंगवरुन बोल्टने यासंदर्भातील घोषणा केली. त्याने फादर्स डे निमित्त फॅमिली फोटो पोस्ट करत आपल्या मुलांच्या नावाची घोषणा केली. पोस्टमध्ये बोल्टने विजांचे इमोन्जी वापरत मुलांच्या नावाची घोषणा केली असली तरी त्यांचा जन्म कधी झाला याची माहिती दिलेली नाही.

हा फोटो बोल्टची पार्टनर केसीनेही शेअर केला असून या फोटोंमध्ये दोन जुळ्या मुलांबरोबरच या दोघांची मुलगी ऑलम्पिया लायटनिंग बोल्टही दिसत आहे. या फोटोला केसीने कॅप्शन देताना, माझ्या फॉरएव्हर प्रेमाला फादर्स डेच्या शुभेच्छा. उसेन तू या कुटुंबाचा आधार आहे आणि आपल्या मुलासाठी सर्वोत्तम वडील आहे. आमचे तुझ्यावर खूप प्रेम असल्याचे म्हटले आहे.

२०२० साली ऑलम्पियाचा जन्म झाला आहे. पण तिच्या नावाची घोषणाही तिच्या जन्मानंतर दोन महिन्यांनी करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा उसेन बोल्टने आपल्या मुलांची नावे ठेवताना विजेशी त्याचा संदर्भ असेल याची काळजी घेतल्यामुळे नेटकऱ्यांनी या नावांबद्दल अनेक प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.

ऑलिम्पिक २००८, २०१२ आणि २०१६ मध्ये ३४ वर्षीय बोल्टने तब्बल आठ सुर्वण पदकांची कमाई केली. कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आलेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये बोल्ट सहभागी होणार नाही. २०१७ साली बोल्टने निवृत्तीची घोषणा केली.