कोकाकोलाच्या बाटल्या पाहून भडकला रोनाल्डो

युरो कप डिफेंडिंग चँपियनशिप स्पर्धेत पोर्तुगाल टीमचा कप्तान क्रिस्तियानो रोनाल्डो पत्रकार परिषदेत कोका कोलाच्या बाटल्या टेबलावर ठेवलेल्या पाहून भडकला. या बाटल्या हटवायला सांगताना त्याने ओरडून ‘शीत पेये नाही, पाणी प्यायची सवय करा’ असे सुनावले.

३६ वर्षीय रोनाल्डो फिटनेस साठी कोणत्याही शीतपेय अथवा एरेटेड ड्रिंकपासून दूर आहे. कोका कोला ११ देशात खेळल्या जाणाऱ्या युईएफए म्हणजे युरो कपचा अधिकृत प्रायोजक आहे. त्यामुळे कंपनीने ब्रांड व्हॅल्यु वाढविण्यासाठी सर्व पत्रकार परिषदामध्ये कोकाकोलाच्या बाटल्या डिस्प्ले केल्या होत्या. हंगेरी विरुध्दच्या सामन्याअगोदर रोनाल्डो पत्रकार परिषदेत आला तेव्हा टेबलवर कोकाकोलाच्या दोन बाटल्या होत्या. त्या पासून रोनाल्डो संतापला असे समजते.

फिटनेस साठी रोनाल्डो अतिशय काटेखोरपणे डायट सांभाळतो. दिवसात सहावेळा खाणे, पाच वेळा दीड दीड तासाची झोप, नाश्त्यासाठी मीट, चीज आणि दही, मध्ये भूक लागली तर टोस्ट, दोन वेळा लंच, दोन वेळा डिनर असा त्याचा डायट प्लान आहे असे समजते.