गुगल क्रोममध्ये मोठे अपडेट; मिळणार धोकादायक फाईल्सची माहिती


नवी दिल्ली : तुम्ही जर गुगल क्रोम वापरत असाल, तर तुम्हाला यापुढे आता अधिक सुरक्षित सुविधा मिळू शकते. कारण गुगलकडून क्रोम ब्राउजरमध्ये आता मोठे अपडेट होणार असल्यामुळे क्रोम ब्राउजरमध्ये युजर्संना काहीही सर्च करणे आणि डाउनलोड करणे सुरक्षित होईल. यामुळे गुगलला फसवणूकीसारखी प्रकरणे रोखण्यास मदत मिळणार आहे.

लवकरच एक नवे सेफ्टी फीचर गुगलकडून लाँच करण्यात येणार आहे. त्याशिवाय एक स्कॅनिंग टूलही लाँच केले जाईल. ज्यामुळे युजरला डाउनलोडिंग आधीच धोकादायक फाईल्सबाबत सूचना मिळेल. हे फीचर गेल्यावर्षी सुरक्षित ब्राउजिंगसाठी लाँच केलं गेले होते.

याबाबत क्रोम सिक्योरिटीचे वरुण खनेजा यांनी दिलेल्या माहितीनुसार, आता अॅडिशन प्रोटेक्शन या फीचरमध्ये दिले जाईल. अशात ज्यावेळी क्रोम वेब स्टोरवरुन नवे एक्सटेंशन इन्स्टॉल केल्यानंतर, एक डायलॉग बॉक्स दिसेल, जो तुम्ही इन्स्टॉल करत असलेले एक्सटेंशन सुरक्षित आहे की नाही सांगेल.

नव्या सेफ्टी अपडेटनंतर क्रोमवर आलेल्या एखाद्या फाईलला, गुगल सेफ ब्राउजिंगसाठी अपलोड करेल. त्यानंतर रियल टाईममध्ये गुगल लिंकचा तपास करेल आणि फाईल असुरक्षित असल्यास, क्रोम एक नोटिफिकेशन जारी करेल. याबाबत गुगलने दिलेल्या माहितीनुसार, अॅडव्हान्स सेफ ब्राउजिंग युजर्सला इतर ब्राउजिंगच्या तुलनेत 35 टक्के अधिक सुरक्षित आहे.