अजित पवार आणि छत्रपती शाहू महाराज भेटीची कल्पना नव्हती; संभाजीराजेंची माहिती


पुणे – राज्यातील राजकीय वातावरण मराठा आरक्षणावरुन तापलेले असतानाच आज सकाळी कोल्हापुरात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छत्रपती शाहू महाराज यांची भेट घेऊन संवाद साधला. सोमवारी कोल्हापुरातील नवीन राजवाडा येथे जाऊन शाहू महाराजांची कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आलेल्या अजित पवारांनी भेट घेत चर्चा केली. जवळपास एक तास अजित पवार आणि छत्रपती शाहू महाराज यांच्यात बैठक सुरु होती. दरम्यान मराठा आरक्षणावरुन सध्या आक्रमक असणारे छत्रपती संभाजीराजे यांनी या भेटीवर प्रतिक्रिया दिली आहे.

पुण्यात उदयनराजेंची भेट घेऊन संभाजीराजे यांनी मराठा आरक्षणावर चर्चा केली. यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी भेटीसंबंधी विचारण्यात आले असता ते म्हणाले की, अजित पवार यांना आशीर्वाद घ्यायचा असेल. त्या भेटीत काय झाले याची माहिती नाही. ही भेट होणार आहे, याची मला अजिबात कल्पना नव्हती. मला राजमहालातून कळवण्यात आले होते. पण काही सकारात्मक होत असेल तर स्वागतच आहे.