अत्री ऋषींना प्राचीन काळापासून ज्ञात होते ग्रहण

या वर्षातले पहिले सूर्यग्रहण १० जून रोजी झाले. भारताच्या फार थोड्या भागात हे ग्रहण दिसले. आजकाल खगोल शास्त्राच्या प्रगती मुळे ग्रह, तारे, त्यांचे प्रवास, ग्रहणे, पिधाने, युती या विषयी खूप माहिती उपलब्ध आहे. पण जेव्हा कोणतीही प्रगत साधने नव्हती तेव्हा सुद्धा भारतीय ऋषींना खगोलशास्त्र माहिती होते. अत्री ऋषीना त्या काळात सुद्धा ग्रहणाची माहिती होती.

प्राचीन भारतातले मोठे वैज्ञानिक अशी अत्री ऋषीची ओळख आहे. भगवान ब्रह्माचे ते मानसपुत्र. पुराणानुसार चंद्र, दत्तात्रेय आणि दुर्वास ही ब्रह्माची मुले. ऋग्वेदात अत्री ऋषीचा उल्लेख येतो. त्यांची पत्नी अनुसूया हिने सतीच्या बळावर ब्रह्मा, विष्णू महेश याना बाळ रूप दिल्याची कथा प्रसिद्ध आहे. अत्री ऋषींना चंद्र, सूर्य ग्रहणाची माहिती होती आणि त्यांनी ती त्यांच्या परिवाराला दिली होती.

खगोलशास्त्राचे गुढ उकलून त्यांनी ताऱ्यांचे अध्ययन केले होतेच पण अज्ञात ग्रहांचे अध्ययन सुद्धा केले होते. त्यांच्या काळात एका वर्षात तीन ग्रहणे झाली ती महाभारत काळात. महाभारत युद्ध सुरु झाले तेव्हा ग्रहण होते, युद्ध संपले तेव्हाही ग्रहण होते आणि युद्धाच्या मध्यात सुद्धा एक ग्रहण झाले होते असे सांगतात. जयद्रथ वधाच्या वेळी सूर्यग्रहण होते असे पुरावे आज मिळतात.

ज्योतिष शास्त्रानुसार एका वर्षात तीन किंवा अधिक ग्रहणे झाली तर ते शुभ मानले जात नाही. नैसर्गिक संकटे येणे, सत्ता परिवर्तन, लोकांचे नुकसान, आजार वाढणे, देशाच्या अर्थव्यवस्थेत चढ उतार असे परिणाम या काळात पाहायला मिळतात असे मानले जाते.