राखी सावंतने रामदेव बाबांची केली कोरोनाशी तुलना


बॉलिवूडची ड्रामा क्वीन अर्थात अभिनेत्री राखी सावंत आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे सतत चर्चेत असते. राखी नुकतीच दमनमध्ये सुरु असलेले ‘इंडियन आयडल १२’चे शूटिंग संपवून मुंबईत परत आली आहे आणि तिने येताच कोरोनाची तुलना ही योगगुरु रामदेव बाबांशी केली आहे.


सेलिब्रिटी फोटोग्राफर ‘विरल भयानी’ या इन्स्टाग्राम पेजवरून राखीचा हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. पोल्का डॉटचा काळ्या रंगाचा टॉप राखीने परिधान केला आहे. अरे देवा, हा कोरोना आहे ना…कोरोना म्हणजे एकदम बाबा रामदेव यांच्यासारखा आहे. कोरोना कधी येतो, कधी लपतो तर कधी बाहेर निघून जातो, असे राखी म्हणाली. सध्या सोशल मीडियावर राखीचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे.

योगगुरू रामदेव बाबा देखील गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहेत. अ‍ॅलोपथी औषधांविरुद्ध वक्तव्य केल्याचा आणि पतंजलीच्या कोरोनिल किटमुळे कोरोना बरा होतो, असा दावा त्यांनी केला होता. यामुळे डॉक्टरांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.