आयकर विभागाच्या नव्या संकेतस्थळात त्रुटी, निर्मला सीतारमण यांची प्रतिक्रिया


नवी दिल्ली : आयकर विभागाची (Income tax) नवी वेबसाईट लाँच झाली असून वेबसाईट लाँच झाल्याच्या काही वेळातच त्यात समस्या येत असल्याचे समोर आले आहे. अनेक युजर्सनी याबाबत तक्रारही केली आहे. याबाबत स्वत: अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनीही आता ट्विट केले आहे. एका ट्विटर युजरच्या तक्रारीवर अर्थमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

नवीन इन्कम टॅक्स पोर्टल काल लाँच करण्यात आले. हे नवे पोर्टल अ‍ॅक्सेस करण्यास अनेकांना समस्या येत असल्याचे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. तसेच टेक्नोलॉजी कंपनी Infosys आणि त्याचे को-फाउंडर Nandan Nilekani यांना टॅग करत, त्यांनी टॅक्सपेअर्सला देण्यात येणाऱ्या सर्विसमध्ये क्विलिटीची कोणतीही कमी नसावी असेही आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.


Infosys कंपनीने नवे इन्कम टॅक्स पोर्टल तयार केले असून Infosys GSTN चे IT इन्फ्रास्ट्रक्चर हे मॅनेज करत आहे. सोमवारी 7 जून रोजी नवे पोर्टल लाँच करण्यात आले. पोर्टल लाँच झाल्यानंतर अनेक लोकांनी साईट ओपन होत नसल्याच्या तक्रारी केल्या. अर्थमंत्र्यांनीही याबाबत अनेक लोकांच्या तक्रारी सोशल मीडियावर येत असल्याचे म्हटले आहे.

सर्व प्रकारचे इंटरअ‍ॅक्शन आणि अपलोड किंवा प्रलंबित क्रिया नव्या पोर्टलमध्ये एकाच डॅशबोर्डवर प्रदर्शित केल्या जातील. ज्याद्वारे टॅक्सपेअर्स (tax payers) सर्व गोष्टी ट्रॅक करू शकतील. नव्या पोर्टलद्वारे टॅक्सपेअर्सला इन्कम टॅक्स फॉर्म भरणे, टॅक्स प्रोफेशनल्स जोडणे, फेसलेस स्क्रूटनी किंवा नोटिशीला उत्तर देणे यासारखे अनेक फायदे मिळतील. परंतु सध्या हे पोर्टल अ‍ॅक्सेस करण्यास युजर्सला समस्या येत आहेत.