कोविड संदर्भात भारतीय ‘द सिकर’ ने चीनचा केला पर्दाफाश

कोविड १९ ची उत्पत्ती चीनमध्येच झाली असल्याचा भक्कम पुरावा ‘ द सिकर’ या नावाने संशोधनात कार्यरत असलेल्या भारतीयाने दिल्याने चीनचे पितळ उघडे पडले आहे. एका वैज्ञानिक जोडी सह जगभर ‘द सिकर’ नावाने प्रसिद्ध असलेल्या या संशोधकाने कोविड १९ विषाणू वुहानच्या प्रयोगशाळेत मानवी प्रयत्नातून विकसित गेल्याचे पुरावे दिले आहेत. आणि जगाला या विषयी पुन्हा विचार करण्यास भाग पडले आहे.

सोशल मीडियावर ‘द सिकर’वर जोरदार चर्चा सुरु आहे. वुहान इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी मध्ये या विषाणूवर प्रयोग झाल्याचे पुरावे देऊन त्याने सिध्द केले आहे. आरएटीजी ( सार्स कोव २)शी मिळताजुळता विषाणू चीनच्या मोजीयांग खाणीत मिळाला होता. त्याच्या संसर्गाने तीन मजुरांचा मृत्यू झाला होता आणि नंतर याच विषाणूवर वुहान प्रयोगशाळेत प्रयोग झाले आणि आज जगभर हा विषाणू हैदोस घालतो आहे.

डॉ. मोनाली रहाळकर, डॉ. राहुल बहुलेकर यांच्या शिवाय या टीममध्ये तिसरा संशोधक होता. ३० वर्षाचा हा युवक प्रथम भारतात राहत होता मात्र त्याचे राहण्याची ठिकाण त्याने कधीच उघड केले नाही. टाईम्स ऑफ इंडियाच्या प्रश्न उत्तर पद्धतीने झालेल्या संवादात या तरुणाने त्याला शांत आणि बडेजाव नसलेले आयुष्य आवडते असे सांगितले होते. हा तरुण सायन्स टीचर, आर्किटेक्ट आणि फिल्ममेकर आहे असे समजते.

त्याने दिलेल्या माहितीनुसार २०२० मध्ये चीनच्या एका तज्ञाच्या थिसीस मधील माहितीनुसार २०१२ मध्ये मोजीयांग भागातील एका खाणीत खूप वटवाघुळे होती आणि या खाणीत काम करणाऱ्या सहा पैकी तीन मजुरांना श्वसन संबंधी त्रास होऊन त्यांचा मृत्यू झाला होता. या मजुरात दिसलेली लक्षणे करोनाशी मिळतीजुळती होती.. ‘द सिकर’ च्या मते करोना संक्रमण नैसर्गिक नाही तर प्रयोगशाळेत या विषाणूवर अधिक प्रयोग करून धोकादायक विषाणू तयार केला गेला आणि हे संक्रमण जीवघेणे ठरले.