राज्यात या निर्बंधांच्याच चौकटीत राहूनच वाजणार पुन्हा सनई चौघडे


मुंबई : राज्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन, संचारबंदीचे नियम लागू करण्यात आले होते. राज्यातील वाहतुकीसोबतच कार्यक्रम, समारंभ आणि लग्नसोहळ्यांवरही याचे थेट परिणाम पाहायला मिळाले होते. या नियमांच्या पार्श्वभूमीवर कोरोनाच्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळवण्यासाठी अंत्यविधीपासून लग्नसोहळ्यांपर्यंत सर्वच कार्यक्रमांच्या उपस्थितांच्या संख्येवर मोठ्या प्रमाणात निर्बंध लावण्यात आले होते.

लग्नसोहळ्यांसाठी अवघ्या 25 पाहुण्यांची उपस्थिती सांगण्यात आल्यामुळे अनेक कुटुंबांमध्ये मोठा गोंधळही पाहायला मिळाला. काहींनी याच परिस्थितीत विवाहसोहळे उरकून घेतले. पण, या निर्बंधांमध्ये आता मोठ्या प्रमाणात शिथिलता आणली गेली आहे.

राज्य शासनाच्या नियमावलीनुसार पहिल्या टप्प्यामध्ये येणाऱ्या ठिकाणी लग्नसोहळे कोणत्याही निर्बंधाशिवाय सुरु राहतील. तर, दुसऱ्या टप्प्यामध्ये लग्नसोहळ्यांमध्ये 50 टक्के क्षमतेने सोहळा पार पाडण्याची अनुमती देण्यात आली आहे. तिसऱ्या टप्प्यासाठीही 50 टक्के क्षमतेचेच नियम लागू असतील. चौथ्या टप्प्यामध्ये लग्नसोहळ्यांसाठी 25 उपस्थितांनाच परवानगी देण्यात आली आहे. तर, पाचव्या टप्प्यामध्ये हे नियम आणखी कठोर करत लग्नसोहळा फक्त कुटुंबीयांपुरताच सीमित ठेवण्यात आला आहे.

राज्य शासनाने लग्नसोहळ्याबाबत दिलेले हे नवे नियम पाहता आता पुन्हा एकता लग्नसराईचे दिवस अखेरच्या टप्प्यात असतानाच एकाएकी या विवाहसोहळ्यांची संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, मुख्यमंत्री कार्यालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार पहिल्या टप्प्यामध्ये येणारे जिल्हे आणि शहरांमध्ये कमीतकमी निर्बंधित असतील, तर तर पाचव्या टप्प्यातील निर्बंध अधिक कडक असतील. आर्थिक राजधानी मुंबईचा समावेश तिसऱ्या टप्प्यात आहे. अधिसूचनेनुसार पहिल्या टप्प्यात येणारे जिल्हे आणि शहरांमध्ये कमीतकमी निर्बंधित असतील, तर तर पाचव्या टप्प्यातील निर्बंध अधिक कडक असतील. आर्थिक राजधानी मुंबईचा समावेश तिसऱ्या टप्प्यात आहे.