मुंबई : राज्य सरकारनंतर आता मुंबई महानगरपालिकेने देखील अनलॅाकची नियमावली जारी केली आहे. राज्य सरकारने जारी केलेल्या गाईडलाईन्सनुसार मुबंई तिसऱ्या टप्प्यात आहे. मुंबईचा आताचा पॉझिटिव्हिटी रेट 5.30 टक्के आहे. पण पुढील आठवड्यात पॉझिटिव्हिटी रेटमध्ये सुधारणा होईल, अशी शक्यता असल्यामुळे पुढील आठवड्यासाठी इतर महानगरपालिकांसोबत चर्चा करुन मुंबई महानगरपालिका नवी नियमावलीही जारी करण्याची शक्यता आहे.
अनलॅाक संदर्भात मुंबई महानगरपालिकेची नियमावली जारी
दरम्यान मुंबईची लाईफलाईन असलेली लोकल सेवा सुरु होणार की नाही याची मुंबईकर आतुरतेने वाट पाहत आहेत. पण सर्वसामान्य नागरिकांना लोकलसाठी आणखी थोडी वाट पाहावी लागणार आहे. सध्या तरी लोकल सर्वसामान्यांसाठी बंदच राहणार आहे. आधीच्या गाईडलाईन्सप्रमाणे केवळ अत्यावश्यक सेवेकरिताच लोकल प्रवासास परवानगी असणार आहे.
राज्य सरकारने जारी केलेल्या गाईडलाईन्सनुसार तिसऱ्या टप्प्यात काय सुरु काय बंद?
- सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवेतील दुकाने आणि सोमवार ते शुक्रवार 7 ते 2 वाजेपर्यंत इतर दुकाने सुरू राहतील. अत्यावश्यक सेवा वगळता शनिवार आणि रविवार इतर दुकाने बंद राहतील.
- मॉल्स आणि सिनेमागृह पूर्णपणे बंद राहतील
- सकाळी 7 ते 2 वाजेपर्यंत हॉटेल्स 50 टक्के क्षमतेने खुली रहातील. दुपारी 2 नंतर पार्सल सेवा सुरू राहिल. शनिवार आणि रविवार बंद राहतील.
- सकाळी 5 ते 9 यावेळेत सार्वजनिक उद्याने, मैदाने, वॉकिंग ट्रॅक, सायकलिंग ट्रॅक सुरू असतील.
- खाजगी आणि सरकारी कार्यालयात 50 टक्के क्षमतेने उपस्थिती राहील.
- इनडोअर खेळले जाणारे खेळ बंद राहतील
- स्टुडीओमध्ये चित्रपटांच्या चित्रीकरणाला परवानगी असेल.
- सामाजिक, सांस्कृतिक, मनोरंजनात्मक कार्यक्रमाला 50 टक्के क्षमतेने (सोमवार ते शुक्रवार) दुपारी 2 वाजेपर्यंत परवानगी राहील.
- लग्न सोहळ्यास 50 जणांची उपस्थिती, अंत्यसंस्कारासाठी 20 जणांची उपस्थिती तर इतर बैठकांसाठी 50 टक्के उपस्थित राहील.
- कृषी क्षेत्रातील कामांना आणि ई कॉमर्स, बांधकाम क्षेत्रातील कामांना दुपारी 2 वाजेपर्यंत परवानगी राहील.
- दुपारी 2 वाजल्यानंतर जमावबंदी कायम राहिल.