५ वर्षांचे वेळापत्रक आयसीसी कडून जाहीर,चँपियन ट्रॉफी पुन्हा सुरु होणार

आयसीसीने २०२४ ते २०३१ असे पुढील ५ वर्षाचे वेळापत्रक मंगळवारी जाहीर केले आहे. त्यानुसार चँपियन ट्रॉफी परत सुरु होणार होणार असून या काळात दोन चँपियन ट्रॉफी स्पर्धा खेळल्या जाणार आहेत. वर्ल्ड कप मध्ये १४ टीम खेळतील तर टी २० विश्वकप सामने दर दोन वर्षांनी होतील.

पुढच्या सिझन मध्ये विश्व कसोटी चँपियनशिपचे चार तर दोन चँपियन ट्रॉफी खेळल्या जाणार आहेत. २०२७ च्या ५० ओव्हरच्या विश्वकप मध्ये १४ संघ सहभागी होतील. आयसीसीच्या संचालक बैठकीत झालेल्या या निर्णयाबद्दल एक पत्रक मिडियाला दिले गेले आहे.

आयसीसीने महिला टूर्नामेंट वेळपत्रक अगोदरच निश्चित केले आहे. टी २० विश्वकप मध्ये १६ संघ खेळणार आहेत. सध्या  ५० ओव्हरच्या विश्वकप स्पर्धेत १० संघ खेळतात. आयसीसी ने जाहीर केलेले शेड्यूल असे आहे,

पुरुष वर्ल्ड कप २०२७ आणि २०३१ मध्ये होतील त्यात १४ टीम्स खेळतील. टी २० विश्वकप मध्ये २० टीम खेळतील. २०२४, २६ ,२८,आणि २०३० मध्ये ५५ सामने खेळले जातील तर चँपियन ट्रॉफी २०२५ आणि २०२९ मध्ये आठ टीम मध्ये खेळविली जाईल. विश्व कसोटी चँपियनशिप २०२५,२०२७,२०२९ आणि २०३१ मध्ये होणार आहे.