दिलासादायक; राज्यातील नव्या कोरोनाबाधितांसह बळींच्या संख्येतही मोठी घट


मुंबई: राज्यातील रोजच्या नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत गेल्या काही दिवसांपासून घसरण होत आहे. त्याचबरोबर आज नव्या बाधितांचा आकडा १५ हजारांच्या जवळपास घसरला आहे. तसेच कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या आज निदान झालेल्या रुग्णांच्या संख्येच्या दुपटीहून अधिक आहे. तसेच आज दिवसभरात मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांची संख्याही खाली घसरली आहे. यामुळे राज्याला मोठा दिलासा मिळत असल्याचे चित्र आहे.

मागील २४ तासांत राज्यात १५ हजार ०७७ एवढ्या नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर आज एकूण ३३ हजार रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत. याबरोबरच राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या देखील कमी होत असून ती आज २ लाख ५३ हजार ३६७ वर आली आहे.

राज्यात आज एकूण १८४ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच सध्या राज्यातील मृत्यूदर १.६६ टक्के एवढा आहे. त्याचबरोबर राज्यात आज ३३ हजार रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, तर आतापर्यंत एकूण ५३ लाख ९५ हजार ३७० रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.८८ टक्क्यांवर पोहोचले आहे.