द वॉल्ट डिस्ने कंपनी या वर्षात बंद करणार स्पोर्टसह १०० चॅनल्स

द वॉल्ट डिस्ने कंपनी या वर्षी दक्षिण पूर्व आशिया मध्ये स्टार स्पोर्ट्स व फॉक्स स्पोर्ट्ससह १०० चॅनल्स बंद करणार आहे. कंपनीचे मुख्य कार्यकारी बॉब चापेक यांनी जेपी मोर्गनच्या वार्षिक जागतिक प्रौद्योगिकी, मिडिया व दूरसंचार संमेलनात ही घोषणा केली. या वेळी चापेक यांनी २०२० मध्ये ३० चॅनल बंद केले गेल्याची माहिती दिली. त्याचबरोबर २०२१ मध्ये १०० चॅनल बंद केले जाणार असल्याचेही सांगितले.

डिस्नेने भारतासह हॉंगकॉंग मध्ये अनेक स्पोर्ट्स चॅनल बंद करण्याच्या निर्णयानंतर डी टू सी कडे वळण्याचे संकेत दिले आहेत. या वर्षी सप्टेंबर मध्ये स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स २, फॉक्स स्पोर्ट्स ३ सह १८ चॅनल बंद केले जाणार आहेत. भारतात हे सर्व चॅनल बंद होणार का याचा स्पष्ट खुलासा केला गेलेला नाही.

चापेक यांच्या मते भारत एक वेगळाच बाजार आहे. हा बाजार असामान्य असा आहे. त्यांच्याकडे बँड विड्थ कमी असल्याने भारताबाबत वेगळे धोरण आखावे लागणार आहे. भारतात स्थानिक भाषा अधिक महत्वाच्या आहेत आणि अश्यावेळी बँड विड्थ कमी असल्याने नक्की कशावर फोकस करावा असा सवाल आहे.