क्रिप्टोकरन्सी जगात ‘दुबई कॉइन’ ची धमाकेदार एन्ट्री

क्रिप्टोकरन्सीच्या आभासी जगात आता ‘दुबई कॉइन’ची धमाकेदार एन्ट्री झाली आहे. पहिल्याच दिवशी या कॉइनने १ हजार टक्के रिटर्न देऊन सर्वांनाच चकित केले आहे. या कॉइनची मूळ किंमत ०.१७ डॉलर्स होती ती चोवीस तासात १.१३ डॉलरवर गेल्याचे समजते. अर्थात हे दुबई कॉइन काही ठराविक एकस्चेंजवरच व्यवसाय करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार हे व्यवहार पब्लिक ब्लॉक चेनवर आधारित आहेत. म्हणजे ग्राहक स्वतः आपली डीबीआयएक्स जनरेट करू शकतात. युएई मधील कंपनी अरेबियन चेन टेक्नोलॉजीने ही करन्सी लाँच केली आहे.

मात्र दुबई इलेक्ट्रॉनिक सिक्युरिटी सेन्सर नुसार या करन्सीला कोणत्याही अधिकृत एजन्सीने मान्यता दिलेली नाही. ज्या वेबसाईटने ही करन्सी प्रमोट केली आहे, त्यांच्याकडे त्याचा परवाना नाही. ग्राहकांची वैयक्तिक माहिती चोरण्याचा हा एक डाव असल्याचे सांगितले जात आहे. अरेबियन चेन टेक्नोलॉजीने प्रसिद्ध केलेल्या प्रेस रिलीज मध्ये मात्र पारंपारिक चलनाच्या जागी दुबई कॉइन लवकरच खरेदी आणि सेवा पेमेंटसाठी वापरले जाईल. युएई क्रिप्टो करन्सी गुंतवणूकदारांसाठी सुरक्षित जागा मानली जाते.