2 हजारांची नोट होणार हद्दपार! आरबीआयची माहिती


मुंबई : आता आगामी काही दिवसात तुमच्या खिशातील 2000 रुपयांची नोट गायब होणार आहे. कारण 2 हजारांच्या या नोटांची छपाई थांबवण्यात आली आहे. 2000 रुपयांची नोट रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने हळूहळू चलनातून मागे घ्यायला सुरुवात केली आहे. या नोटांची गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षीही छपाई होणार नसल्याची माहिती आरबीआयने दिली आहे.

गेल्या आर्थिक वर्षात आरबीआयने 2000 रुपयांच्या नोटा छापल्या नव्हती. ही नोट 2021-2022 या आर्थिक वर्षातही छापली जाणार नसल्याचे आरबीआयने आपल्या वार्षिक रिपोर्टमध्ये सांगितले आहे. हा रिपोर्ट 26 मे 2021 रोजी जारी करण्यात आला होता.

आरबीआयच्या या रिपोर्टनुसार 2021 मध्ये कागदी नोटा 0.3 टक्के घटून 2,23,301 लाख युनिट आहेत. मूल्याचा विचार करता मार्च 2021 मध्ये 4.9 लाख कोटी रुपयांच्या 2000 नोटा चलनात होत्या. तर मार्च 2020 मध्ये 2 हजाराच्या 5.48 लाख कोटी रुपयांच्या नोटा होत्या. मार्च 2018 ते 2000 मध्ये 336.3 कोटी नोटा होत्या. मार्च 31, 2021 मध्ये यांची संख्या घटून 245.1 कोटींवर आली आहे. याचा अर्थ तीन वर्षांत 91.2 कोटी नोटा चलन व्यवस्थेतून बाहेर करण्यात आल्या आहेत.