या देशातील 68% कचऱ्याचे होते रिसायकिलींग


जूबलिजाना- कचरा करण्यास स्लोवेनियाची राजधानी असलेले जुबलिजानामध्ये सक्त मनाई असून येथे कचरा न फेकता त्याचा पुरेपूर वापर केला जातो. एक व्यवस्था त्यासाठी करण्यात आलेली आहे. एका जागेवरच कचरा लोकांनाही टाकता येईल यासाठी कंटेनर अनेक ठिकाणी ठेवण्यात आले आहेत. याबाबत माहिती देताना जुबलिजानाच्या वेस्ट मॅनेजमेंट कंपनीच्या नीना सेंकोव्हिच यांनी सांगितले की, कचरा गोळा करण्यासाठी 15 वर्षांपूर्वी सुरू केलेल्या मोहिमेला लोकांनी नकार दिला होता, पण संपुर्ण चित्र आज बदलले आहे. आपल्या पर्यावरणाला कचऱ्यामुळे धोका असतो त्यामुळे ही मोहिम सुरू करण्यात आली.

जुबलिजानाच्या स्थानिक प्रशासनाद्वारे 2002 मध्ये, रस्त्याच्या कडेला रद्दी पेपर, काच यासारख्या वस्तूं गोळा करण्यासाठी स्टीलचे कंटेनर ठेवण्यात आले. कर्मचाऱ्यांनी चार वर्षांनंतर 2006 मध्ये नैसर्गिकरित्या नष्ट होणाऱ्या (बायोडिग्रेडेबल) कचऱ्याला घरोघर जाऊन गोळा करणे सुरू केल्यामुळे युरोपातील इतर देशांमध्ये बायोवेस्टला घरोघरी जाऊन गोळा करणे 2013 मध्ये अनिवार्य करण्यात येणार आहे. तर जुबलिजानामध्ये दोन दशकापूर्वीच ही मोहिम सुरू झाली आहे.

जुबलिजानाद्वारे 2008 मध्ये एकूण 29.3 टक्के कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर सुमारे 68 टक्के कचऱ्यावर 2019 मध्ये प्रक्रिया झाली. जूबलिजाना कचऱ्या प्रक्रिया करण्यात युरोपमधील एकमेव राजधानी आहे. तसेच, जुबलिजानामध्ये बायोलॉजिकल वेस्ट साफ करण्यासाठी जगातील सर्वात चांगला प्लँट उभारण्यात आला असल्यामुळे आता 2025 पर्यंत 75 टक्के कचरा रिसायकल करण्याचे लक्ष जूबलिजानाचे आहे.

रीजनल सेंटर फॉर वेस्ट मॅनेजमेंट 2015 मध्ये त्यांनी सुरू केले होते. संपुर्ण स्लोव्हेनियाच्या आज एकूण सुविधांपैकी एक तृतियांश सेवा याच प्रादेशिक केंद्राद्वारे पूर्ण होत आहेत. तसेच, येथील घरातून निघणाऱ्या 95 टक्के कचऱ्यापासून विज आणि नैसर्गिक गॅसदेखील तयार केला जातो. आणि उर्वरित राहणाऱ्या बायोवेस्टचा उच्च गुणवत्तेच्या खत तयार केले जाते. विशेष म्हणजे, घरातील कचरा एकत्रित करण्यासाठी जूबलियानामध्ये दोन सेंटर बनवण्यात आले आहेत. तसेच, यामध्ये तीन आणखी सेंटरची उभारणी करण्याची त्यांची योजना आहे. एका स्थानिकाने सांगितले की, आम्हाला चांगले माहिती आहे की, कचरा कुठे टाकायचा. या सुविधेमुळे आम्हाला चांगली सवय लागली आहे.

जागेची स्लोव्हेनियामध्ये अतिशय कमतरता असल्यामुळे ‘वेस्ट मॅनेजमेंट कंपनी, ‘वोका स्नागा’ने जमीनमध्येच कचरा टाकण्यासाठी 67 यूनिट कंटेनर निर्माण केले आहेत आणि ते उघडण्यासाठी लोकांना नियमित कार्ड दिले गेले आहेत. ऐतिहासिक ओळख शहराला असल्यामुळे येथे सतत पर्यटक येतात. त्यामुळे कचरा गोळा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पायी चालावे लागते. सोबतच रस्ता स्वच्छ करण्यासाठी एक विशेष गाडी तिथे उपलब्ध असते. सफाईसाठी बायोडिग्रेडेबल डिटर्जेंटचा वापर केला जातो. शहरातील प्रत्येक कोपऱ्यावर वेगवेगळ्या कचऱ्यासाठी कंटेनर ठेवले आहेत.

Leave a Comment