गुजरात : गुजरातमधील उदयपूर शहरातील आदिवाश्यांमध्ये लग्नाची एक विचित्र प्रथा आहे. नवरदेवचा येथे होणाऱ्या लग्नात सहभाग नसतो. गावकऱ्यांच्या नियमानुसार लग्नात नवरदेवाऐवजी त्याची अविवाहित बहीण किंवा त्याचा कुटुंबातील दुसरी एखादी अविवाहित महिला त्याचे प्रतिनिधित्व करते. आपल्या आईसोबत नवरदेव घरीच थांबतो. तर वधूकडे वऱ्हाड घेऊन नवरदेवाची बहीण जाते आणि तिच्यासोबत लग्न करते. वधूसोबत बहीणच सप्तपदी करते आणि तिला आपल्या घरी आणते.
गुजरातमधील या गावातील नवरदेवाच्या बहीणसोबत होते नववधूची सप्तपदी
यासंदर्भातील वृत्त एका वृत्तसंस्थेने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार याबाबत माहिती देताना सुरखेड़ा गावातील कानजीभाई राथवाने सांगितले की, नवरदेवाच्या बहीणकडून लग्नातील सर्व विधी पूर्ण करण्यात येतात. सप्तपदी नवरदेवाची बहीणच घेते. तीन गावांत ही प्रथा असून ही प्रथा पार नाही पाडली तर अडचणींचा सामना करावा लागतो, असे या गावातील लोकांचे म्हणणे आहे.
गावचे सरपंच रामसिंहभाई राथवाने सांगितले की, ही प्रथा मोडीत काढण्याचा अनेकांनी प्रयत्न केला. पण नंतर त्याच्यासोबत वाईट घटना घडल्या. एक तर त्यांचे लग्न मोडले नाहीतर त्यांच्या घरातील अडचणी वाढल्या. विशेष म्हणजे, शेरवानी नवरदेव परिधान करू शकतो. पण तो स्वतःच्याच लग्नात सहभागी होऊ शकत नाही. सुरखेडा, सनाडा आणि अंबल या गावांनी ही परंपरा स्वीकारली आहे.