पाश्‍चात्य आहाराबाबत तारतम्य


आपण भारतीय लोक अनुकरणप्रिय असतो. विशेषत: अमेरिकेतले लोक काही तरी करीत आहेत असे आपल्याला दिसले की आपण मागचा पुढचा विचार न करता तसे करायला लागतो. सामान्य जीवनातल्या रिती भाती आणि आहार याबाबत हे अनुकरण फार प्रमाणात केले जाते. आपल्या खाण्यातला ब्रेड, चहा, बिस्किट वगैरे आपण ब्रिटीशांकडून उचलले आहेत. एका बाजूला हे अनुकरण होत असतानाच दुसर्‍या बाजूने या अनुकरणाच्या विरोधातही वातावरण तयार केले जात आहे. पाश्‍चात्त्याचे खाद्य पदार्थ हे टाकावू, चरबी वाढवणारे, रक्तदाबाला निमंत्रण देणारे आणि मधुमेहाला कारणीभूत ठरणारे आहेत असा जोरदार प्रचार सध्या सुरू आहे.

अशा वातावरणात आपल्याला नेमका संभ्रम पडतो की आपले भारतीय म्हणवले जाणारे पदार्थ चांगले की पाश्‍चात्त्याचे ? असा प्रश्‍न आपल्याला पडतो. तेव्हा आपल्याला योग्य विश्‍लेषण करून सांगणारा कोणी तरी हवा असतो. असे तज्ज्ञ लोक सांगत आहेत की पाश्‍चात्त्यांकडून आपण घेतलेले खाद्यपदार्थ सरसकट टाकावू नाहीत. त्यातही काही गुण आहेत आणि आरोग्याला उपकारक ठरतील असे काही घटक त्यातही आहेत. आपण ज्यांना पाश्‍चात्त्य खाद्य आणि पेये असे समजतो त्यात साखर खूप असते आणि चरबीचे प्रमाण मर्यादेच्या बाहेर असते. म्हणूनच त्यांना त्याज्य मानले जाते. मात्र अमेरिकेतल्या मिड वेस्टर्न युनिव्हर्सिटीतले प्राध्यापक दुसराच काही तरी खुलासा करीत आहेत. या पदार्थातील साखरेचे जादा प्रमाण लहान आतड्यातले बॅक्टेरियाचे प्रमाण वाढवते आणि ते वाढले की आपल्या पचन शक्तीला बढावा मिळतो.

पाश्‍चात्यांच्या खाद्यपदार्थात फायबरचे प्रमाण कमी असल्याने त्यांचे पचन नीट होत नाही आणि त्यातून काही प्रकारचे कर्करोग उद्भवतात. लिव्हरचे काही विकारही त्यानेच निर्माण होतात. या संबंधीच्या अनेक समस्या पाश्‍चात्त्य पदार्थातून निर्माण होतात. असे मानले जाते पण अमेरिकेतले हे संशोधन तर असे सांगते की, या खाद्यापदार्थातले अनेक सूक्ष्म जंतू उलट पचन शक्ती वाढवण्यास मदत करीत असतात. सेल होस्ट या मासिकात हे संशोधन सविस्तर प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. माणसाच्या शरीरात साचलेली चरबी हा सर्वात मोठा प्रश्‍न आहे. पण पाश्‍चात्त्य खाद्यपदार्थातले सूक्ष्म जंतू शरीरात साचू पाहणारी चरबी शोषून घेतात आणि माणसाचे त्यापासून संरक्षण करीत असतात.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment