मोदींना मिळाला सर्वोत्तम अभिनेत्याचा ऑस्कर ; राम गोपाल वर्माचा व्हिडीओ चर्चेत


पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुक्रवारी वाराणसीमधील डॉक्टरांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला होता. त्यावेळी कोरोनामुळे मरण पावलेल्यांबद्दल बोलताना मोदींचा कंठ दाटून आला. मोदी देशातील आणि वाराणसीमधील परिस्थितीबद्दल बोलत होते. याचवेळेस कोरोनामुळे आपल्या जवळच्या अनेक प्रिय व्यक्तींना प्राण गमावावा लागला आहे. कोरोनामुळे मरण पवालेल्यांना श्रद्धांजली अर्पण करताना मोदींना आपल्या भावना आवरता आल्या नाही आणि त्यांना रडू आले.

पण मोदींच्या या रडण्याची सर्वाधिक चर्चा सोशल मीडियावर दिसून आली. मोदींचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर ऑस्कर्स हा हॅशटॅग ट्रेण्ड होऊ लागला. डॉक्टरांशी संवाद साधताना मोदी ज्याप्रकारे रडले, तो सर्वोत्तम अभिनय होता यासाठी त्यांना ऑस्कर्स पुरस्कार द्या अशी टीका अनेकांनी केल्यामुळे सध्या OSCAR हा शब्द ट्रेण्डमध्ये आहे. शुक्रवारपासून सुरु असणाऱ्या या ट्रेण्डमध्ये बॉलिवूड दिग्दर्शक राम गोपालवर्मा यांनीही ट्विट केले आहे.


ऑस्कर्स पुरस्कार सोहळ्यातील काही क्षणचित्रे एडीट करुन राम गोपाल वर्मा यांनी तयार केलेला छोटा व्हिडीओ पोस्ट केला आहे. पुरस्कार देणारी महिला या व्हिडीओमध्ये सुरुवातीला सर्वोत्तम अभिनेता पुरस्कारासाठी नामांकन सांगत आहे. असे म्हणते आणि त्यानंतर मोदींच्या संवादामधील रडण्याची क्लिप व्हिडीओत लावण्यात आली आहे. मोदी बोलत असतानाच्या व्हिडीओच्या बॅकग्राऊण्डला कल हो ना हो चित्रपटातील हर घडी बदल रही है… गाण्याचे म्युझिक वापरण्यात आले आहे.

काही पत्रकार टाळ्या वाजवतानाही व्हिडीओमध्ये दाखवण्यात आले आहेत. त्यानंतर ऑस्कर गोज टू म्हणत मोदींच्या नावाची घोषणा केली जाते. व्हिडीओच्या शेवटी मोदींचा चेहरा मॉर्फ करुन त्यांच्या हाती ऑस्कर पुरस्काराची बाहुली दाखवण्यात आली आहे. त्याप्रमाणे नरेंद्र मोदी या शब्दांचा वापर करुन बनवण्यात आलेलं इंग्रजी गाण्याच्या चालीवरील गाणेही व्हिडीओच्या शेवटी वापरले आहे. हा आतापर्यंतचा सर्वोत्तम ऑस्कर पुरस्कार असल्याची कॅप्शन त्यांनी या व्हिडीओसाठी लिहिली आहे.