राज्यातील कोरोनामुक्त होणाऱ्यांचा रिकव्हरी रेट ९१.०६ टक्के


मुंबई – राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होत होत असल्याचे दिसत आहे. काल दिवसभरात ५१ हजार ४५७ बाधितांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचा रिकव्हरी रेट ९१.०६ टक्के एवढा झाला आहे. तर एका दिवसात ३४ हजार ३१ नवे कोरोनाबाधित रुग्ण समोर आले आहेत. यांसंदर्भातील माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली आहे.

कोरोनामुळे राज्यात एका दिवसात ५९४ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर हा १.५४ टक्के एवढा आहे. राज्यात ३० लाख ५९ हजार ९५ रुग्ण गृह विलगीकरणात आहेत. तर २३ हजार ८२८ रुग्ण संस्थात्मक विलगीकरण कक्षात आहेत. आजपर्यंत राज्यात ३ कोटी १८ लाख ७४ हजार ३६४ जणांचा कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यापैकी ५४ लाख ६७ हजार ५३७ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सध्या राज्यात ४ लाख १ हजार ६९५ सक्रीय कोरोना रुग्ण आहेत

दरम्यान आज दिवसभरात पुणे शहरात १ हजार १६४ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर आज अखेर आतापर्यंत ४ लाख ६२ हजार १७२ एवढी कोरोनाबाधितांची संख्या झाली आहे. तर याच दरम्यान काल दिवसभरात ४८ रुग्णांचा मृत्यू झाला, असून मृतांची संख्या ७ हजार ८४३ झाली. त्याच दरम्यान २ हजार ४०७ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर आज दिवसाखेर ४ लाख ३९ हजार ९७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

तर दुसरीकडे आर्थिक राजधानी मुंबईत काल दिवसभरात १३५० नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर ४,५६५ रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले आहे. मुंबईत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३ टक्के आहे. सध्या मुंबईत २९,६४३ सक्रीय रुग्ण आहेत. रुग्ण दुप्पटीचा दर २६९ दिवसांवर पोहोचला आहे. १२ मे ते १८ मे दरम्यात रुग्णवाढीचा दर हा ०.२५ टक्के एवढा होता.

प्रमुख जिल्हानिहाय सक्रिय रुग्णांची आकडेवारी

  • मुंबई- २९,४४५
  • ठाणे- २८,३८३
  • पुणे-६७,२९५
  • नाशिक- १८,४३२
  • औरंगाबाद- ७,३३७
  • नागपूर- २३,२७२