साधूसंत, ऋषी-मुनी का परिधान करतात खडावा ?


ऋषी-मुनींनी खडावा पायी धारण करण्याची परंपरा वेदिक काळापासून रूढ आहे. अनेक साधूसंत आजही पायी खडावा धरण करीत असतात. खडावा धरण केल्या जाण्यामागे ज्याप्रमाणे धार्मिक कारणे आहेत, त्याचप्रमाणे काही वैज्ञानिक कारणे ही आहेत. यजुर्वेदाच्या अनुसार खडावा पायी धारण केल्याने अनेक तऱ्हेच्या व्याधींपासून शरीराचे रक्षण होते. तसेच गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांताच्या अनुसार पृथ्वी प्रत्येक वस्तू आपल्याकडे आकर्षित करीत असते. याच गुरुत्वाकर्षणामुळे आपल्या शरीरातील उर्जा किंवा विद्युततरंग पावलांच्या वाटे जमिनीमध्ये जात असतात. ही उर्जा आणि विद्युततरंग जमिनीमध्ये न जाता शरीरामध्येच राहावेत यासाठी साधूसंत खडावांचा वापर करीत असल्याचे म्हटले गेले आहे.

खडावा धरण केल्याने पायांचे स्नायू बळकट होतात आणि शरीराचे संतुलन उत्तम राहत असून, याचा सकारात्मक परिणाम पाठीच्या मणक्यांवरही होत असतो. पायांमध्ये लाकडी खडावा धारण केल्याने शरीरातील रक्ताभिसरण उत्तम राहत असल्याचे यजुर्वेदामध्ये म्हटले आहे. तसेच खडावा धारण केल्याने शरीरामध्ये सकारात्मक उर्जेचे संचरण होत असते. बर्फाळ प्रदेशामध्ये गेले असता, लाकडी खडावा बर्फाच्या थंडाव्यापासून पावलांचे रक्षण करीत असत. लाकडाची उपलब्धता भारतामध्ये सहजसाध्य असल्याने त्यापासून पादुका किंवा खडावा बनविल्या जात असत. चामड्यापासून बनलेली पादत्राणे साधुसंतांसाठी निषिद्ध मानली गेली असल्याने ते केवळ लाकडी खडवाच धारण करीत असत.

Leave a Comment