कोण होता ‘टेड बंडी’ ?


नेटफ्लिक्स वर प्रसारित केल्या जात असलेल्या ‘द टेड बंडी टेप्स’ या सिरीजमुळे एके काळी सिरियल किलर म्हणून कुख्यात असलेल्या टेड बंडी बद्दल अधिक जाणून घेण्याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये वाढली असून, त्याच्याबद्दलचे प्रेक्षकांच्या मनातील कुतुहल शिगेला पोहोचले आहे. ‘एक्सट्रीमली विकेड, शॉकिंगली इव्हिल अँड व्हाईल’ या नावाने प्रसारित करणाऱ्या सिरीजमध्ये अभिनेता झॅक एफ्रॉन टेड बंडीची भूमिका साकारत आहे. या सिरीजमध्ये टेड बंडीच्या आयुष्यावर आधारित अनेक प्रसंग दर्शविण्यात आले असून, टेड बंडीला मृत्यूची शिक्षा ठोठविली जाण्यापूर्वीचे त्याच अखेरचे भोजन काय होते, हे जाणून घेऊन लोकांच्या विविध प्रतिक्रिया त्यावर पहावयास मिळाल्या आहेत. टेड बंडीला २४ जानेवारी १९८९ रोजी मृत्यूची शिक्षा ठोठविण्यात आली. विजेच्या खुर्चीमध्ये विजेचे असंख्य धक्के देऊन ही शिक्षा पूर्ण केली गेली.

टेड बंडी हा आजवरच्या जागतिक गुन्हेगारी इतिहासामध्ये सर्वात कुख्यात सिरीयल किलर म्हणून ओळखला गेला आहे. तीस स्त्रियांच्या खुनाची कबुली त्याने न्यायासनासमोर दिली असली, तरी त्याहूनही किती तरी अधिक स्त्रियांचे निर्घृण खून त्याने केले असल्याची खात्री पोलीस दलाला होती. मात्र टेड बंडीला त्या खुनांशी जोडणारे कोणतेही पुरावे पोलीस मिळवू शकले नसल्याने हे गुन्हे टेड वर सिद्ध होऊ शकले नाहीत. १९७० आणि १९८०च्या दशकामध्ये पॅसिफिक नॉर्थवेस्ट पासून फ्लोरिडा पर्यंतच्या प्रांतांमध्ये टेड बंडीने अनेक स्त्रियांचे प्राण घेतले. फ्लोरिडा मध्ये त्याने केलेल्या तीन खुनांच्यानंतर अखेरीस त्याला पकडण्यास पोलिसांना यश आले.
देहदंडाची शिक्षा सुनाविली गेल्यापासून पुढे दहा वर्षांच्या नंतर ४१ साक्षीदारांच्या उपस्थितीमध्ये २४ जानेवारी १९८९ रोजी सकाळी सात वाजता टेडला विजेच्या खुर्चीमध्ये विजेचे तीव्र झटके देऊन मृत्यूची शिक्षा देण्यात आली. देहदंड होणार त्यादिवशी ज्याप्रमाणे कैद्यांना ज्याप्रमाणे त्यांच्या आवडीचे खाद्यपदार्थ खाऊ घातले जातात, त्याचप्रमाणे टेडला ही त्याच्या आवडत्या खाद्यपदार्थांची मागणी करण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र टेडने भोजनासाठी कोणत्याही विशेष पदार्थाची न केल्यामुळे तुरुंगामध्ये कैद्यांना जे ठराविक भोजन दिले जाते, तेच भोजन टेडलाही दिले गेले.

टेडला जे भोजन दिले गेले, त्याला त्याने स्पर्शही केला नाही. साक्षीदारांनी कथन केलेल्या हकीकतीनुसार टेडला जेव्हा विजेची खुर्ची असलेल्या कक्षामध्ये आणण्यात आले, तेव्हा तीसाहून आधी स्त्रियांचे बळी घेतलेल्या टेडचे सगळेच उसने अवसान गळाले. टेडने वीस वर्षांच्या कालावधीमध्ये केलेले अपराध इतके भयंकर होते, की त्या तुरुंगामध्ये शिक्षा भोगत असलेल्या इतर कैद्यांच्या मनामध्ये देखील टेडबद्दल केवळ संतापाचीच भावना होती. म्हणूनच की काय, जेव्हा टेडला डॉक्टरांनी मृत घोषित केले, तेव्हा तिथे उपस्थित असलेले सर्व साक्षीदार, टेडच्या अमानुष कृत्यांना बळी पडलेल्या स्त्रियांचे नातलग आणि सर्व कैद्यांमध्येही आनंदाचा एकच जल्लोष ऐकू आला.

Leave a Comment