दुर्लभ फुलाच्या उमलण्याने का पळाले गावकऱ्यांंच्या तोंडचे पाणी ?


छत्तीसगड राज्यातील बस्तर जवळील जंगलांमध्ये आजकाल बांबूच्या झाडांवर फुलांचे घोस दिसू लागले आहेत. बांबूचे फुल तसे दुर्मिळच, पण त्यामुळे हे फुल पाहून आनंद न होता, येथील ग्रामस्थांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. बस्तर गावामध्ये तर सध्या घरोघरी या फुलांची चर्चा सुरु असून, सर्व गावामध्ये भीतीचे वातावरण आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार ही फुले जंगलामध्ये जेव्हाही उमललेली पाहिली गेली, त्या त्या वर्षी गावामध्ये भयंकर दुष्काळ पडला. आताही ही फुले उमललेली पाहून दुष्काळ पडणार की काय या भीतीने गावकरी चिंतेत पडले आहेत.

मात्र यावर वैज्ञानिकांचे म्हणणे विचारात घेतले, तर बांबूची फुले उमलली की दुष्काळ पडणे ही केवळ एक अंधश्रद्धा असल्याचे वैज्ञानिक म्हणतात. वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार ही फुले अनेक वर्षांतून एकदाच उमलतात, पण जेव्हा उमलतात, तेव्हा या फुलांचे घोसच्या घोस बांबूवर उमललेले पहावयास मिळतात. बांबूची फुले दर काही वर्षांनी उमलणे ही एक सामान्य, नैसर्गिक प्रक्रिया असून, याचा आणि दुष्काळाचा कोणताही संबंध नसून हा केवळ एक योगायोग असल्याचे वैज्ञानिक म्हणतात. बांबूवर आलेली फुले वाळू लागली, की या फुलांमध्ये असलेल्या बिया गावकरी, आदिवासी गोळा करून साठवून ठेवतात. या बिया खाता येण्यासारख्या असून, अनेक पदार्थांमध्ये त्यांचा वापर केला जातो.

Leave a Comment