‘कौशल्य व उद्योजकता विकास’ या विषयावर बार्टीमार्फत वेबिनार


मुंबई : महाराष्ट्रातील नवउद्योजकांना प्रशिक्षित करण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, बार्टी पुणे मार्फत कोविड-19 या महामारीच्या काळात महाराष्ट्र शासनाने आखून दिलेल्या निर्देशांनुसार कौशल्य व उद्योजकता विकास या विषयाच्या अनुषंगाने ऑनलाईन वेबिनारचे आयोजन 18 ते 20 मे 2021 या काळात करण्यात आले आहे. 18 मे 2021 रोजी “जीएसटी आणि त्याचे महत्त्व” या विषयावर विद्याधर गायकवाड (सहायक आयुक्त जीएसटी, मुंबई), यांच्यामार्फत व्याख्यान देण्यात येणार आहे.

तसेच दि. 19 मे 2021 रोजी “Business Incubator म्हणजे काय, त्याची उद्दिष्टे, कार्ये, व Basic Mechanics of Starting Incubator Center या विषयावर चक्रधर दोडके (संचालक, मास्टर स्ट्रोक प्लस, नागपूर, Mentor, BEDC, सदस्य Bombay Productivity Council व माजी सहा. संचालक भारत सरकार (Ministry of MSME) हे व्याख्यान देतील. 20 मे 2021 रोजी “उद्योजकता विकास व शासकीय योजना” या विषयावर गणेश खामगळ (संचालक, मिटकॉन, पुणे) हे व्याख्यान देणार आहेत.

सदर कार्यक्रम झूम मिटिंगद्वारे आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी आय.डी. : ८७२४१६३३७७१ व पासवर्ड : १२३४ चा वापर करावा. तसेच सदर कार्यक्रमात बार्टीच्या फेसबुक पेजवर लाईव्ह (LIVE) वरून सुद्धा सहभागी होता येईल, त्याची लिंक https://www.facebook.com/BARTIConnect आहे. तसेच या कार्यक्रमांचे पुनःप्रक्षेपण त्याच दिवशी युट्यूबद्वारे बार्टीच्या ऑनलाईन (Barti Online Channel) चॅनेलवरून सायंकाळी 6.30 वाजता करण्यात येईल. तरी महाराष्ट्रातील नवउद्योजकांना तथा उद्योग सुरू करू इच्छिणाऱ्या तरुण तरुणींनी सदर कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन बार्टी संस्थेचे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांनी केले आहे.