निर्बंध काळात अनावश्यक घराबाहेर फिरणाऱ्यांवर कारवाई करा – शंभूराज देसाई


सातारा : राज्य सरकारने कडक निर्बंध लावूनही काही नागरिक अनावश्यकपणे घराबाहेर फिरत आहेत, अशा नागरिकांवर पोलीसांनी कारवाई करावी, अशा सूचना गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात जिल्ह्यातील कोरोना संसर्गाबाबतचा आढावा गृह राज्यमंत्री देसाई यांनी घेतला. जिल्ह्यातील विविध नाक्यांवर पोलीस विभागामार्फत तपासणी केली जाते, या तपासणी कामास नगर परिषदांनी मदत करावी, अशा सूचना करुन गृह राज्यमंत्री देसाई पुढे म्हणाले, जे नागरिक अनावश्यकपणे रस्त्यांवर फिरत आहेत अशांवर कारवाई करा. तसेच कडक निर्बंध असूनही काही ठिकाणी गर्दी दिसत आहे ही गर्दी कमी करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करा, अशा सूचनाही त्यांनी शेवटी केल्या.