मिथुन चक्रवर्ती आणि दिलीप घोष यांच्याविरुद्ध फिर्याद दाखल, हिंसाचाराला प्रोत्साहन देण्याचा आरोप

कोलकाता पोलिसांनी तृणमुल कार्यकर्त्याच्या तक्रारीवरून बीजेपीचे बंगाल प्रमुख दिलीप घोष आणि अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांच्या विरोधात फिर्याद दाखल करून घेतल्याचे समजते. दोन दिवसांपूर्वी तृणमुलचे कार्यकर्ते मृत्युंजय पॉल यांनी दिलीप घोष आणि मिथुन चक्रवर्ती यांनी बीजेपी कार्यकर्त्यांना पश्चिम बंगाल मध्ये हिंसाचारास प्रवृत्त केल्याची तक्रार पोलिसांत दाखल केली होती. रविवारी मिथुन आणि दिलीप घोष यांच्या विरोधांत फिर्याद दाखल केली गेल्याचे समजते.

पश्चिम बंगाल मध्ये विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली नवे सरकार स्थापन झाले आहे. मात्र एक आठवडा लोटून गेल्यावर सुद्धा राज्यात हिंसाचार सतत सुरु आहे. बीजेपीने तृणमुलचे कार्यकर्ते बीजेपी कार्यकर्त्यांना निशाणा बनवत आहेत आणि त्यामुळे ३०० ते ४०० कार्यकर्त्यांनी आसाम मध्ये आश्रय घेतल्याची तक्रार केली होती. २ मे पासून बंगालच्या विविध भागात हिंसा होत आहे आणि त्यात अनेक भाजप कार्यकर्ते ठार केले गेल्याचेही भाजपचे म्हणणे आहे.

या उलट तृणमुलने भाजप कार्यकत्यांनी तृणमुल कार्यकर्त्यांची घरे जाळली असल्याने त्यांना रस्त्यावर बेघर फिरावे लागत असल्यचे आरोप केले आहेत. मिथुन आणि दिलीप घोष यांच्या विरुध्द इंडियन पीनल कोड कलम १५३ ए, ५०४,५०५ खाली गुन्हा दाखल केला गेला आहे.