हे गाव सुंदर, पण निर्मनुष्य, उजाड


आजच्या काळामध्ये मोठ्या मोठ्या शहरांमध्ये राहत असताना सततच्या धावपळीच्या जीवनापासून थोडेसे लांब जाण्यासाठी निसर्गाच्या कुशीमध्ये लपलेली लहान लहान गावे पर्यटनाच्या दृष्टीने लोकप्रिय होऊ लागली आहेत. शहरांमध्ये असते तसे प्रदूषण, धावपळ येथे नाही. माणसांची गर्दी, वाहनांची कोंडी, गोंगाट या सर्वांपासून लांब असलेल्या एखाद्या गावामध्ये दोनचार दिवस जरी मुक्कामासाठी गेले तरी मनाची सगळी मरगळ दूर होते. आजकाल शहरांमध्ये शिक्षणाच्या, रोजगाराच्या संधी अधिक असल्याने आपली गावे सोडून शहरांकडे जाणाऱ्यांची संख्या वाढताना दिसत आहे. पण
तरीही आपापल्या गावांशी या मंडळींचे लागेबांधे कायमच जुळलेले असतात. त्यामुळे जेव्हा शक्य असेल तेव्हा, सणासुदीच्या निमित्ताने, किंवा घरातील काही कार्याच्या निमित्ताने ही मंडळी आपापल्या गावांकडे परतत असतात.

इंग्लंडमधील विल्टशायर प्रांतातील ‘कोपहिल डाऊन’ नामक गाव अतिशय सुंदर आहे. या टुमदार गावाला निसर्गाचा वरदहस्त लाभलेला आहे. पण तरीही आज हा गाव उजाड, निर्मनुष्य आहे. एके काळी ब्रिटीश सैन्यातील सैनिकांसाठी हा गाव वसविला गेला होता. या गावाचे निर्माण १९८८ साली शीतयुद्धाच्या काळामध्ये, येथे राहून युद्धाचा सराव करता यावा यासाठी केले गेले होते. त्याकाळी या गावाला ‘FIBUA’ (fighting in built up areas) या नावाने संबोधले जात असे, सैनिकांना राहण्यासाठी सर्व प्रकारच्या सुविधा या गावाला उपलब्ध करविण्यात आल्या होत्या. सामान्य नागरिकांना या गावामध्ये येण्यास बंदी होती.

आजच्या काळामध्ये ब्रिटीश जरी सैन्य येथे नसले, किंवा हे गाव औपचारिक रित्या सैनिकी तळ म्हणून ओळखले जात नसले, तरी देखील या गावामध्ये सर्वसामान्यांना प्रवेश करण्यास आजही बंदी आहे. मात्र येथे असलेल्या सुविधांचा वापर आता काही ऐतिहासिक पुनर्विकास संस्थांद्वारे करण्यात येत असतो.

Leave a Comment