‘हायपोथायरॉईडीझम’च्या समस्येसाठी असा असावा आहार


सततचा शारीरिक थकवा, शैथिल्य, आणि वारंवार मूड्स बदलत राहणे, वजन अचानक वाढणे किंवा घटू लागणे हे थायरॉईड ग्रंथी व्यवस्थित काम करीत नसल्याचे सूचक असू शकते. डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य तपासणी केली गेल्यास या रोगाचे निदान होऊ शकते. थायरॉइड हा शरीरातील एक महत्वपूर्ण हार्मोन असून, ग्रंथीच्या द्वारे हा हार्मोन पुरेशा प्रमाणात तयार केला जात नसेल तर ‘हायपोथायरॉईडीझम’ हा विकार उद्भवतो. या उलट थायरॉईड हा हार्मोन प्रमाणाबाहेर तयार होत असेल तर ‘हायपरथायरॉईडीझम’ हा विकार उत्पन्न होतो. आजच्या काळामध्ये जगामध्ये सुमारे २७ मिलियन लोक हायपोथायरॉईडीझमने ग्रस्त आहेत. थायरॉईड ग्रंथीच्या कामामध्ये बिघाड झाल्यास सतत शारीरिक थकवा, नैराश्य, उदास मनःस्थिती, वजन घटणे किंवा वाढणे, त्वचा रुक्ष होणे, केसगळती, आणि मेंदूची विचार करण्याची क्षमता प्रभावित होणे, यासारखी लक्षणे दिसून येतात.

थायरॉईड ग्रंथी गळ्याच्या खालच्या बाजूला असून, शरीरातील अनेक कार्ये या ग्रंथींच्या द्वारे नियंत्रित केली जातात. त्यामुळे या ग्रंथीचे कार्य बिघडले, तर त्याच्या परिणामस्वरूप शरीरामध्ये अनेक बदल घडून येण्यास सुरुवात होते. हायपोथायरॉइडीझम या विकारामध्ये थायरॉइड ग्रंथीचे कार्य विस्कळीत झाल्याने हा हार्मोन पुरेसा तयार होत नाही. अशा वेळी औषधोपचारांची गरज भासत असून, हा हार्मोन कृत्रिम रित्या तयार होण्यासाठी औषधे दिली जातात. बहुतेकवेळी ही औषधे कायमस्वरूपी असून, वेळोवेळी तपासण्या केल्याने थायरॉईड ग्रंथी कितपत कार्यरत आहे हे समजून घेऊन औषधांचे डोस निश्चित करता येतात.

पण अलीकडच्या काळामध्ये झालेल्या अनेक संशोधनांच्या द्वारे थायरॉइड ग्रंथींचे कार्य सुरळीत चालण्यासाठी अनेक औषधांच्या सोबत अनेक नैसर्गिक उपचारही सहायक असल्याचे दिसून आले आहे. यामध्ये आपल्या आहारामध्ये काही अन्नपदार्थांचा समावेश करून हायपोथायरॉईडीझम नियंत्रणात ठेवता येत असल्याचे निश्चित निदान शास्त्राज्ञांनी केले आहे. काबुली चणे, किंवा छोल्यांमध्ये फायबर मुबलक मात्रेमध्ये असून, ‘हायपोथायरॉईडीझम’मध्ये सामान्यपणे उद्भविणारे बद्धकोष्ठ याच्या सेवानाने कमी होते. समुद्री वनस्पतींमध्ये आयोडीन मुबलक मात्रेमध्ये असते. थायरॉईड ग्रंथीच्या कार्यासाठी आयोडीन महात्वाचे तत्व आहे. त्यामुळे समुद्री वनस्पती वापरून बनविल्या गेलेल्या सप्लिमेंट या विकारामध्ये उपयुक्त ठरू शकतात. समुद्री वनस्पतींच्या बरोबरच अंडी, दुध आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये आयोडीनची मात्रा मुबलक आहे.

सफरचंद, आंबट फळे, आलुबुखारे, आणि नाशपाती यामध्ये असलेले पेक्टिन हे तत्वही या विकारामध्ये उपयुक्त आहे. माश्यांमध्ये असलेले ओमेगा थ्री फॅटी अॅसिड्सही या विकारामध्ये उपयुक्त आहेत. आयुर्वेदाच्या अनुसार गुग्गुळ या विकारामध्ये उपयुक्त असल्याचे म्हटले जाते. हायपोथायरॉईडीझममध्ये कोबी, फ्लॉवर, ब्रोकोली, सोयाबीन इत्यादी पदार्थांचे सेवन माफक असावे. त्याचप्रमाणे आहारातील साखरेचे प्रमाणही नियंत्रित असावे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment