हे देश महिलांना नोकरीसाठी सुरक्षित


आपल्या देशाप्रमाणेच सगळ्याच देशातील स्त्रिया घराबाहेर पडून नोकरी करतात. वर्क आणि लाइफ यांचा तोल नोकरी करताना योग्य प्रकारे सांभाळला गेला तर महिलांसाठी नोकरी करायला तो देश चांगला असतो. आज आम्ही आपल्या अशाच काही देशांबद्दल सांगणार आहोत जिथे महिला आनंदाने आणि सुरक्षित नोकरी करू शकतात.

चेकियामधील 83 टक्के महिला आपल्या नोकरीत खूश आहेत. महिलांसाठी नोकरी करण्यासाठी बहरीनही सुरक्षित मानला जातो. इतर देशातून महिला येथे येऊन नोकरी करतात. तैवानमध्ये 66 टक्के नोकरी करणाऱ्या महिला आहेत, तर 62 टक्के पुरुष आहेत. 73 टक्के स्त्रियांसाठी नाॅर्वेमध्ये जाॅब सिक्युरिटी आहे तर पुरुषांसाठी 69 टक्के आहे .

डेन्मार्क महिलांसाठी नोकरी करण्यासाठी सर्वोत्तम देश आहे. वर्क आणि लाइफचा येथे चांगला मेळ साधला जातो. महिलांना नोकरीत भरपूर सवलतीही मिळतात. लक्झमबर्ग इथे महिलांना नोकरीत जास्त सुरक्षा मिळते. न्यूझिलंडमध्ये नोकरी करणाऱ्या महिला 78 टक्के आहेत तर पुरुष 70 टक्के आहेत. नेदरलँड या देशातही महिला चांगल्या वातावरणात नोकरी करतात. इथे 68 टक्के महिला नोकरी करतात.

स्त्रियांना नोकरी करण्यास माल्टा हा देशही उत्तम आहे. येथे नोकरीत वातावरण चांगले असते. 58 टक्के महिला आणि 48 टक्के पुरुष येथे नोकरी करतात. आॅस्ट्रेलियातही महिला दडपणाशिवाय नोकरी करू शकतात. तिथे स्त्रियांचे नोकरी करण्याचे प्रमाण 70 टक्के आहे.

Leave a Comment