राज्यातील 12 जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत घट; राजेश टोपेंची माहिती


मुंबई : राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे कमी झाल्याचे दिसून येत आहे. आज राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या संदर्भात माहिती दिली की, मागच्या दोन आठवड्याशी तुलना केली तर राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या घटली आहे. राज्यातील 12 जिल्ह्यांमधील कोरोनाबाधितांची संख्या कमी झाली आहे. पण अद्यापही राज्यातील 24 जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येतील वाढ कायम आहे. बाधितांची ही वाढ कमी करणे हे लक्ष्य असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली.

कोरोना टेस्टिंग राज्यात कमी केली नसल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली. दररोज 2.50 लाखांपासून 2 लाख 80 हजारांपर्यंत कोरोना टेस्ट केल्या जात आहेत. टेस्टिंगमध्ये RTPCR टेस्टची संख्या अधिक आहे. आपण 65 टक्के RTPCR टेस्ट करत आहोत आणि अँटिजनची टक्केवारी 35 टक्के आहे. इतर काही राज्यांच्यामध्ये अँटिजन टेस्टची संख्या अधिक आहे.

टेस्टिंगमध्ये कुठल्याही प्रकारची घट न होता. कोरोनाची रुग्णवाढ, पॉझिटिव्हीटी रेट, मृत्यूदर, डिस्चार्स झालेल्या रुग्णांची कमी होत आहे. राज्याचा रिकव्हरी रेट हा 84.7 टक्के आहे तर देशाचा रिकव्हरी रेट हा 81 टक्के असल्यामुळे राज्याचा रिकव्हरी रेट हा देशापेक्षा जास्त असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले.