करोना काळात, अमेरिकेतील नागरिकांनी गुगलवर सर्वाधिक सर्च केली ही पद्धत

गतवर्षी करोना काळात घरी अडकून पडलेल्या अनेकांनी व्यवसाय, शिक्षण पुन्हा रुळावर कसे आणायचे यासाठी मोठा सर्च केलाच पण त्याचवेळी अमेरिकेतील पुरुष मात्र बायकोवर नियंत्रण कसे मिळवायचे आणि दुसऱ्यांना कळणार नाही अश्या बेताने बायकोला कसे बडवून काढायचे यावर सर्वाधिक सर्च करत असल्याचा खुलासा एका नव्या अध्ययनात झाला आहे.

न्यूझीलंडच्या ओटागो विद्यापीठातील लेखिका कॅतरिना यांनी जर्नल टेलर अँड फ्रान्सिस मध्ये हा रिपोर्ट प्रकाशित केला आहे. त्यांनी अमेरिका २०२० गुगल सर्च ट्रॅकिंग केले आणि त्यांच्या समोर धक्कादायक आकडेवारी आली. सुमारे १६.५ कोटी वेळा गुगलला बायकोवर नियंत्रण कसे आणायचे आणि दुसऱ्यांना कळू नये या पद्धतीने मारपीट कशी करायची यासाठी विचारणा केली गेली होती. अर्थात या काळात जगभरात लॉक डाऊन होता आणि या काळात महिलांना घरगुती हिंसाचाराला मोठ्या प्रमाणावर तोंड द्यावे लागल्याच्या बातम्या येत होत्याच पण अमेरिकेत इतकी भयानक परिस्थिती आहे हे उघड झाले नव्हते.

कॅटरिना सांगतात, हे अध्ययन करताना अनिश्चितता, असुरक्षा, हताशपण, हिंसा करणार असल्याचे पुरुषांकडून दिले गेलेले संकेतिक इशारे असे विविध पर्याय देऊन सर्च केल्यावर महिला दुर्व्यवहार घटनात २०२० मध्ये ३१ टक्कांवरून १०६ टक्के वाढ झाल्याचे दिसून आले.

या उलट महिलांनी केलेल्या गुगल सर्च मध्ये पुरुष हिंसेपासून बचाव कसा करायचा हा विषय १२२ कोटी वेळा सर्च केला गेला तर मदत करा, मला मारेल असा विषय १.०७ कोटी वेळा सर्च केला गेला असे दिसून आले.