राज्यात काल दिवसभरात १८ ते ४४ वयोगटातील ११ हजार ४९२ लाभार्थ्यांचे लसीकरण


मुंबई : राज्यात काल १ मेपासून १८ ते ४४ वर्षे वयोगटातील लाभार्थ्यांना लसीकरणाला सुरुवात झाली. त्यासाठी काल २६ जिल्ह्यांत ठराविक ठिकाणी एकूण १३२ लसीकरण सत्रे आयोजित करण्यात आली. सायंकाळी सहा वाजेपर्यंत एकूण ११ हजार ४९२ लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले, असे आरोग्य विभागामार्फत कळविण्यात आले आहे.

कालपासून १८ ते ४४ वयोगटातील लाभार्थ्यांच्या लसीकरणाला २६ जिल्ह्यांमध्ये सुरुवात झाली. उर्वरित जिल्ह्यांमध्ये आज २ मेपासून लसीकरण सुरु करण्यात येणार आहे. सद्यस्थितीत उत्पादकाकडे उपलब्ध असलेल्या साठ्यानुसार राज्याने या वयोगटासाठी कोव्हिशिल्ड लसीचे ३ लाख डोसेस खरेदी केले आहेत.