मे महिन्यामध्ये जन्मलेल्या व्यक्तींचे असे असते व्यक्तिमत्व


एखाद्या व्यक्तीचा ठराविक महिन्यामध्ये, ठराविक नक्षत्रांवर, ठराविक तारखेला झालेला जन्म त्या व्यक्तीला त्याच्या राशीनुसार काही ठराविक स्वभाववैशिष्ट्ये देऊन जात असतो. मे महिन्यामध्ये जन्मलेल्या व्यक्तींचीही काही खास स्वभाववैशिष्ट्ये असतात. या महिन्यामध्ये जन्मलेल्या व्यक्ती काहीशा हट्टी स्वभावाच्या असतात. तसेच या व्यक्ती थोड्या लहरी स्वभावाच्याही असतात. यांना कधी कुठल्या गोष्टीचा राग येईल, कुठल्या गोष्टींनी या व्यक्ती आनंदी होतील याचा नेमका अंदाज समोरच्या व्यक्तीला येऊ शकत नाही. या व्यक्तींच्या मनामध्ये थोडी गर्वाची भावना असून, इतरांपेक्षा आपण अधिक चांगले असल्याची भावना यांच्या मनामध्ये सतत असते.

या व्यक्तींची कामातील जिद्द मात्र वाखाणण्याजोगी असते. एकदा यांच्यावर कुठलीही जबाबदारी सोपविली, की ती जबाबदारी संपूर्णपणे पार पाडण्याची जिद्द या व्यक्तींमध्ये असते. आपले काम पूर्ण करताना आलेल्या प्रत्येक अडचणीवर या व्यक्ती यशस्वीपणे मत करतात आणि त्यांना सोपविलेले प्रत्येक काम तडीस नेतात. या व्यक्तींच्या मनामध्ये नेमके काय चालले आहे, हे ओळखणे कठीण असते. या व्यक्ती इतरांना आपल्या मनाचा थांग लागू देत नाहीत. तसेच आपले विचारही या व्यक्ती उघडपणे बोलून दाखवीत नाहीत.

मे महिन्यामध्ये जन्मलेल्या व्यक्तींचा ‘ड्रेसिंग सेन्स’ उत्तम असतो. प्रत्येकवेळी प्रसंगानुरूप पेहराव, केशभूषा यांचा समन्वय या व्यक्तींना उत्तम साधता येतो. या व्यक्ती स्वभावाने काहीशा आग्रही असतात. त्यांच्या कामामध्ये कोणी काही उणीवा काढलेल्या त्यांना आवडत नाही, आणि आपल्या मतानुसार सर्वांनी वागावे अशी यांची अपेक्षा असते. या व्यक्ती स्वतःच्या जोडीदाराशी असलेल्या नातेसंबंधाच्या विषयी अतिशय हळव्या असतात. पण या बाबतीतही भावनेच्या आहारी न जाता विचारपूर्वक निर्णय घेणाऱ्या अशा या व्यक्ती असतात. या व्यक्ती आपल्या कुटुंबावर मनापासून प्रेम करणाऱ्या असतात. कोणाची फसवणूक करणे, किंवा कोणाला दुखाविणे या व्यक्तींच्या स्वभावात नसते.

Leave a Comment