का बरे पडले असेल या आंब्याला लंगडा असे नाव


उन्हाळ्याची जास्तीत जास्त लोक आतुरतेने वाट बघत असतात कारण या सिझनमध्ये लोकांना निरनिराळ्या प्रकारचे आंबे खायला मिळतात. तुमच्या माहितीसाठी भारतात तब्बल 1500 प्रकारच्या आंब्यांची शेती केली जाते. या र्सवच आंब्यांची चव वेगवगेळी असते. त्यातच आपल्याकडे हापूस, लंगडा आंबा, बदामी आंबा, केशर आंबा हे लोकप्रिय आहेत. यातील लंगडा आंबा हा अनेकांना त्याच्या नावामुळे थोडा वेगळा वाटतो. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की या आंब्याला असे नाव का बरे दिले गेले अथवा पडले असेल ? पण आम्ही आज तुम्हाला याचे उत्तर सांगणार आहोत.

पद्मश्री हाजी कलीमुल्लाह यांनी जेव्हा लंगडा आंब्याबद्दल सांगितले की, साधारण २५० ते ३०० वर्षांपूर्वी बनारसच्या काशीमध्ये लंगडा आंब्याची शेती सुरु करण्यात आली होती. हाजी कलीमुल्लाह पुढे सांगतात की, बनारसमध्ये खूप वर्षांपूर्वी एक पायाने अपंग व्यक्ती राहत होती. त्याला त्याच्या जवळचे लोक प्रेमाने लंगडा म्हणून हाक मारायचे. एकदा एक आंबा या व्यक्तीने खाल्ला आणि तो त्याला फारच आवडला. या आंब्याची गुठळी त्याने घरातील अंगणात लावली. काही वर्षांनी या झाडाला भरपूर आंबे येऊ लागले. जे फारच स्वादिष्ट होते.

या आंब्याची चव अनेक लोकांनाही फारच आवडली. ज्यानंतर त्या व्यक्तीच्या नावावर सर्वांनी मिळून या आंब्याचे नाव लंगडा आंबा असे ठेवले. कलीमुल्लाह यांनी त्यासोबतच हेही सांगितले की, भारतात तशी तर वेगवेगळ्या भागांमध्ये लंगडा आंब्याचे उप्तादन घेतले जाते, पण बनारसचा लंगडा आंबा वेगळाच आहे. देशभरात आंब्याची शेती करण्यासाठी आणि सोबतच नवनवीन प्रजाती विकसित करण्यासाठी कलीमुल्लाह हे ओळखले जातात.

Leave a Comment