बेल्जियममध्ये आयोजित होते ‘बियर लव्हर्स मॅरथॉन’


अलीकडच्या काळामध्ये मॅरथॉन रन्स खूपच लोकप्रिय होऊ लागले आहेत. या स्पर्धा आंतरराष्ट्रीय पातळीवरही मोठ्या प्रमाणात आयोजित केल्या जात असून, जगभरातून हौशी आणि व्यावसायिक धावपटू खास या स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी येत असतात. भारतामध्ये अलीकडच्या काळामध्ये मॅरथॉन स्पर्धांचे आयोजन मोठ्या प्रमाणावर होऊ लागले असून यामध्ये ही भाग घेण्यासाठी देशा-विदेशातून धावपटू येत असतात. बेल्जियम देशातील ‘लीज’ नामक शहरामध्ये आयोजित होणारी मॅरथॉन एकदम हटके असून, ज्यांना बियर प्रिय आहे, खास अशांसाठी ही स्पर्धा असल्याने या स्पर्धेला ‘बियर लव्हर्स मॅरथॉन’ याच नावाने ओळखले जाते.

जगभरातून अनेक बियरप्रेमी धावपटू या खास मॅरथॉनमध्ये सहभागी होण्यास येत असतात. या स्पर्धेच्या प्रत्येक टप्प्यावर धावपटूंना निरनिराळ्या प्रकारची बियर दिली जाते. अशा प्रकारे या स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या धावपटूंना एकूण पंधरा निरनिराळ्या प्रकारच्या बियर्सचा आस्वाद घेण्याची संधी मिळते. बेल्जियमच्या लीज शहरामध्ये ही मॅरथॉन स्पर्धा दरवर्षी आयोजित केली जात असून, या स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या धावपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी स्थानिक नागरिक संगीतवादनही करीत असतात. त्याचबरोबर अनेक हौशी धावपटू आणि त्यांचा उत्साह वाढविण्यासाठी आलेले नागरिक रंगेबिरंगी पोशाख करून या स्पर्धेसाठी हजेरी लावत

Leave a Comment