करोना काळातील वर्क फ्रॉम होम गुगल साठी ठरली सोन्याची संधी

जगातील सर्वात बडे सर्च इंजिन गुगलने करोना काळात बहुतेक सर्व कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम सुविधा दिली आहे. मात्र ही सुविधा कंपनीसाठी संकटातील सोन्याची संधी ठरल्याचे दिसून आले आहे. गेल्या वर्षाभरच्या काळात गुगलने ७४०० कोटींची खर्च बचत केली आहे. गुगलची पेरंट कंपनी अल्फाबेटने दिलेल्या माहितीनुसार पहिल्या तिमाहीत प्रमोशन, प्रवास, मनोरंजन यावर होणाऱ्या खर्चात १९८० कोटी व एकूण वर्षभरात ७४०० कोटींची बचत झाली आहे.

२०२० मध्ये कंपनीचा जाहिरात आणि प्रमोशनल खर्च १४० कोटी डॉलर्सने कमी झाला. म्हणजे हा खर्च १०३६० कोटी रुपयांनी कमी झाला. कंपनीने अनेक कॅम्पेन रीशेड्यूल केली, डिजिटल फॉर्मट संख्या वाढविली. त्यामुळे प्रवास, एंटरटेनमेंट खर्च २७४० कोटींनी कमी झाला. पण याच काळात कंपनीचा महसूल ३४ टक्क्यांनी वाढला आहे.

गुगल, कर्मचारी देखभाल आणि सुविधा याबद्दल विशेष प्रसिद्ध आहे. मसाज टेबल, कॅटरेड क्युझींस, कार्पोरेट रिट्रीट यासाठी कंपनी कर्मचाऱ्यांना भत्ते देते. मात्र गेल्या वर्षभरात स्टाफ भत्ते न घेताच काम करत असल्याने कंपनीचा खर्च कमी झाला आहे.