कोरोना इफेक्ट ! यापुढे फक्त अत्यावश्यक सामानांची डिलीवरी करणार अॅमेझॉन


नवी दिल्लीः कोरोनाची दुसरी लाट भारतात आल्यामुळे अनेक क्षेत्रातील लोकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. देशातील कोरोनाबाधितांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून ई-कॉमर्स साइट अॅमेझॉनने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. देशातील कोरोना महामारीच्या काळात काही शहरात फक्त आवश्यक सामानांची डिलीवरी केली जाणार असल्याचे ई-कॉमर्स साइट अॅमेझॉनने म्हटले आहे.

बीजीआरच्या रिपोर्टनुसार, यासाठी एक मोठा बॅनर अॅमेझॉनची वेबसाइटवर Amazon.in वर लावण्यात आला आहे. या बॅनरवर फक्त आवश्यक सामानांची डिलीवरी केली जाणार असल्याचे म्हटले आहे. अॅमेझॉनच्या अधिकृत निवेदनानुसार, सरकारच्या गाइडलाइन्सला फॉलो करण्यासाठी अॅमेझॉनने हा निर्णय घेतला आहे.

केवळ आवश्यक सामानांची डिलीवर अॅमेझॉन करीत आहे, याला डिलीवरी करण्यासाठी नॉर्मलपेक्षा जास्त टाइम लागत आहे. अॅमेझॉनच्या प्रवक्त्यांकडून सांगण्यात आले आहे की, आम्ही सरकारच्या गाइडलाइन्सचे पालन करीत आहोत. जर एखाद्या ठिकाणी लॉकडाउन आहे. त्या ठिकाणी सरकारकडून सांगण्यात आले की, आवश्यक सामानांची डिलीवरी करा.

हँडवॉश, सॅनिटायजर, डिसइन्फेक्ट, ग्रॉसरी, ग्रुमिंग इसेंशियल, स्कीन अँड हेयर केयर, पर्सनल केयर, हेल्थ फिटनेस, बेबी केयर अँड सप्लाय, क्लिनिंग अँड हाउस सप्लाय आदींचा आवश्यक सामानांच्या यादीत समावेश आहे.

दरम्यान कोरोनाविरोधातील लढाईत अॅमेझॉन देखील मदतीसाठी पुढे आले आहे. अॅमेझॉनने मदत करण्यासाठी ACT Grants, Temasek Foundation आणि Pune Platform सोबत भागिदारी केली आहे. यासाठी अॅमेझॉन ८००० ऑक्सिजन कंन्सेट्रेटर आणि 500 BiPAP मशीनला एअरलिफ्ट करणार आहे. त्याचबरोबर अॅमेझॉनकडून १५०० ऑक्सिजन कंन्सेट्रेटर आवश्यक हॉस्पिटलमध्ये दिले जाणार आहेत.