मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील लॉकडाऊन 15 मे पर्यंत वाढवण्याचा निर्णय


मुंबई : राज्यात 30 एप्रिल पर्यंत लागू असलेला लॉकडाऊन पुढेही कायम राहणार असून 1 मे नंतरचा हा लॉकडाऊन पुढील 15 दिवस कायम राहणार असल्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे राज्यात 15 मे पर्यंत लॉकडाऊन कायम ठेवण्याची मागणी अनेक मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत केली. 15 मे पर्यंत लॉकडाऊन कायम ठेवला, तर फायदा होऊ शकतो, असा तज्ञांनी सल्ला दिला आहे.

लॉकडाऊनचा राज्यात सकारात्मक परिणाम दिसत आहे. गेल्या दोन तीन दिवसांपासून राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या कमी होते आहे. नागरिकांनी मास्क घालणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे हे कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन केले पाहिजे. त्यामुळे 15 दिवसांचा लॉकडाऊन वाढल्याने परिस्थिती नियंत्रणात येण्यास मदत होईल, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले.

आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील 18 ते 14 या वयोगटातील सर्वांना कोविड प्रतिबंधात्मक लस मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याची घोषणा केली. लसीकरण कार्यक्रमाबाबत आरोग्य विभाग नियोजन करीत असून नागरिकांना याबाबत व्यवस्थित पूर्वसूचना देण्यात येईल, त्यामुळे लसीकरण केंद्रांवर अनावश्यक गर्दी करू नये, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

राज्यसमोर सध्या आर्थिक चणचण असूनही नागरिकांच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य असल्यामुळेच 18 ते 44 च्या वयोगटातील सर्वांना मोफत लस देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला असून लसींचा पुरवठा कसा होतो, यानुसार लसीकरण नियोजन करून पुढील कार्यक्रम जाहीर करण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हणाले.