भारताला ऑक्सिजन कॉन्सट्रेटर्स पुरवणार Microsoft; सत्या नाडेला


नवी दिल्ली – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा भारताला जोरदार फटका बसला असून देशात आरोग्य आणीबाणीसारखी परिस्थिती कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे उद्भवली आहे. मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्य नाडेला यांना भारतातील कोरोनाची परिस्थिती पाहून दु:ख झाले असून कोरोनाविरोधातील लढाईत ते मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. ऑक्सिजनचा तुटवडा भारताला जाणवत असल्यामुळे ऑक्सिजन कॉन्सट्रेटर्स मायक्रोसॉफ्ट पुरवणार असल्याचे, सत्या नाडेला यांनी सांगितले आहे.


याबाबत ट्विट करत सत्या नाडेला यांनी भारतातील कोरोनाच्या परिस्थितीवर प्रतिक्रिया देताना देशातील कोरोनाची परिस्थिती पाहून मी हतबल झालो, असल्याचे त्यांनी म्हटले आहे. भारताची सध्याची स्थिती पाहून मी फार दु: खी झालो आहे. अमेरिकेचे सरकार भारताला मदत करत आहे, याबद्दल मी आभारी आहे. भारताच्या मदतीसाठी मायक्रोसॉफ्ट त्यांच्या संसाधनांचा, टेक्नोलॉजीची वापर करेल. तसेच ऑक्सिजन कॉन्सट्रेटर्स पुरवेल, असे ट्विट नाडेला यांनी केले आहे.

मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्य नाडेला यांच्यासह गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई देखील भारताच्या मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. सुंदर पिचाई यांनी भारताला वैद्यकीय मदत करण्यासाठी गुगलकडून १३५ कोटींचा निधी पुरवला जाईल, अशी घोषणा केली. ही मदत गिव्ह इंडिया, युनिसेफ, स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून पुरविली जाईल, असे सुंदर पिचाई यांनी स्पष्ट केले आहे.