भारताला गुगलकडून मदतीचा हात, सुंदर पिचाई यांनी ट्विट करून केली ‘ही’ मोठी घोषणा


नवी दिल्लीः भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर केला असून भारतात कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. त्यात कोरोनाबळींची संख्या सुद्धा कमी होताना दिसत नाही. या दरम्यान, भारताला मदत करण्यासाठी अनेकांनी मदतीचा हात पुढे केला आहे. या दरम्यान, गुगलनेही भारताच्या मदतीसाठी घोषणा केली आहे. गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी ट्वीट करून याची माहिती दिली आहे.


गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी ट्वीट करून म्हटले की, भारतात कोरोनामुळे निर्माण झालेली सध्याची परिस्थिती खूपच बिकट झाली आहे. कोरोना संकट काळात भारतात गुगलकडून १३५ कोटी रुपयांची मदत दिली जाणार आहे. तसेच युनिसेफला मेडिकल सप्लायसाठी, हाय रिस्कची कम्यूनिटीचा सपोर्ट करणाऱ्या संघटना आणि महत्त्वपूर्ण माहिती देण्यात मदत करणाऱ्याला ग्रँट म्हणून देत आहे.