कोरोना परिस्थितीवरून केंद्रावर टीका करणारी ट्विटस ट्विटरकडून blocked


नवी दिल्ली – कोरोनामुळे देशात निर्माण झालेली परिस्थिती, आरोग्य सुविधांसह औषधांचा तुटवडा, कोरोनाबाधितांचे होत असलेले हाल यावरून मते मांडणाऱ्या, तसेच आणि कोरोना परिस्थिती हाताळण्यावरून सरकारवर टीका करणाऱ्या काही नेते व अभिनेत्यांसह काही जणांनी केलेल्या ट्विटवर कारवाई करण्यास ट्विटरला केंद्र सरकारने सांगितले आहे. त्यावरून ट्विटरने काही अकाऊंटवरील ट्विट्स ब्लॉक केले आहेत.

यामध्ये खासदार रेवंथ रेड्डी, पश्चिम बंगालचे मंत्री मुलोय घातक, अभिनेता विनीत कुमार सिंह आणि चित्रपट निर्माते विनोद कापरी आणि अविनाश दास यांच्यासह काही जणांनी कोरोना आणि कुंभमेळ्याबद्दल केलेल्या ट्विटवर कारवाई करण्यात आली आहे. ट्विटर इंडियाला केंद्र सरकारने नोटीस बजावल्यानंतर नमूद करण्यात आलेले ट्विट ब्लॉक करण्यात आले असून, ब्लॉक करण्यात आलेले ट्विट भारतीय माहिती तंत्रज्ञान कायद्याचा भंग करणारे असल्याचे ट्विटरने म्हटले आहे.

ट्विटरकडून ट्विट्स ब्लॉक करण्याच्या कारवाई बद्दल जाहीरपणे भाष्य करण्यात आलेले नाही. त्याचबरोबर ट्विटरने कोणते विशिष्ट ट्विट्स ब्लॉक करण्यात आले आणि का ब्लॉक करण्यात आले याबद्दलही काहीही म्हटलेले नाही. ट्विटरकडून ट्विट करण्यात आलेल्या अकाऊंट धारकांना नोटीस बजावण्यात आली आहे. भारत सरकारने केलेल्या कायद्याचे ट्विटमुळे उल्लंघन होत असल्याचे म्हटले आहे. नोटीसमध्ये माहिती तंत्रज्ञान कायदा-२००० उल्लेख करण्यात आला असून, त्यानुसार ट्विट्सवर कारवाई करत असल्याचे ट्विटरने म्हटले आहे.


देशातील कोरोना औषधी आणि आरोग्य सुविधांची वाणवा याबद्दल भाष्य करणारी ट्विट्स ट्विटरकडून कारवाई करण्यात आलेली होती. औषधींच्या तुटवड्यामुळे रुग्णांना होत असलेल्या त्रासाबद्दलची होती. तर हरिद्वारमधील कुंभमेळ्याबद्दलची काही ट्विट्स होती. देशात कोरोनाचा उद्रेक झालेला असताना होत असलेल्या कुंभमेळ्याबद्दल भाष्य करणारे ट्विट्सही ब्लॉक करण्यात आली आहेत. पण, जे ट्विट्स परदेशातून करण्यात आले आहेत, ते अजून दिसत असून, भारतातून करण्यात आलेले ट्विट्स मात्र डिलीट करण्यात आले आहेत.

आमच्याकडे जेव्हा कायदेशीरपणे विनंती केली जाते, तेव्हा आम्ही ट्विटरचे नियम आमि स्थानिक कायद्यांतील नियम याच्यानुसार पडताळणी करतो. कोणत्याही नियमाचा मजकूरामुळे भंग होत असल्याचे दिसून आल्यास तात्काळ तो मजकूर हटविण्यात येतो. अशा प्रकरणात आम्ही थेट खातेधारकाला सूचना देतो. कारण त्यांच्या अकाउंटसंबंधात आम्हाला कायदेशीर नोटीस आल्याची गोष्ट त्याला माहिती असावी. अकाऊंटसोबत जोडलेल्या खातेधारकाला आम्ही ई-मेलद्वारे याची सूचना देतो, असे ट्विटरने या प्रकरणावर बोलताना म्हटले आहे.