या शौचालयाची किंमत उडवले तुमचे फ्युज


नवी दिल्ली: मुलींचे डिझायनर बॅग वापरण्याचे स्वप्न असते. परंतु त्यांची किंमत त्यांच्या स्वप्नांना ब्रेक लावते. लाखमोलाच्या बॅग विकत घेणे आपल्या सारख्याचे काम नक्की नाही. पण जर तुम्हाला असे समजले की या लाखोच्या किंमत असलेल्या बॅगचे कोणी शौचालय बनवले आहे तर… ऐकायला थोडे अजबच वाटते पण हे खरे आहे. या शौचालयाच्या निर्मितीसाठी चक्क एक किंवा दोन नाही तर तब्बल २४ डिझायनर बॅगचा वापर करण्यात आला आहे.

LVच्या (Louis Vuitton) या २४ लेदर बॅगची किंमत ६५ लाखांपेक्षा जास्त होती. एवढेच नव्हे तर या शौचालयाच्या भांड्यामध्ये या बॅगमध्ये वापरण्यात आलेल्या सोन्याचा वापर केला गेला आहे. एलव्ही ही आंतरराष्ट्रीय लक्झरी फॅशन रिटेल कंपनी आहे. जी आपल्या डिझायनर बॅगसाठी प्रसिध्द आहे १९०१मध्ये या ब्रॅण्डने स्टीमर बॅग आणि १९३०मध्ये साली किपल बॅग बाजारात आणल्या होत्या ज्या आजही खूप लोकप्रिय आहे.

या ब्रॅण्डची सर्वात स्वस्त बॅगची किंमत सुमारे ९०,००० रुपये आहे. तसेच Louis Vuitton न विकल्या गेलेल्या बॅग जाळून टाकतात. याचे कारण म्हणजे उरलेल्या बॅग स्वस्त किंमतीत काढून एलव्ही आपली ब्रँड व्हॅल्यू आणि एक्सक्लुझिव्हिटी कमी करू इच्छित नाही म्हणूनच ते या बॅग जाळून टाकतात.

तथापि, अमेरिकेच्या शिल्पकार इल्मा गोर यांनी २४ बॅगच्या मदतीने या शौचालयाची निर्मिती केली आहे. त्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी लागला. हा कलाकार यापूर्वी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नग्न छायाचित्र तयार केल्यानंतर चर्चेत आला होता.

Leave a Comment