अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ; घर आणि इतर मालमत्तांवर सीबीआयचे छापे


मुंबई : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ झाली असून सीबीआयने अनिल देशमुख यांच्या घर आणि इतर मालमत्तांवर छापे मारले आहेत. सीबीआयने मुंबईसह दहा ठिकाणी धाड टाकली आहे. ही कारवाई 100 कोटींच्या कथित वसुलीच्या आरोपाप्रकरणी केल्याचे समजते. दरम्यान सध्या नागपूरमध्ये अनिल देशमुख असल्याची माहिती समोर येत आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या 100 कोटींच्या कथित वसुलीप्रकरणी सीबीआयने सुरुवातीला अनिल देशमुख यांची चौकशी केली होती. त्यानंतर गुन्हा दाखल झाला आणि आता देशमुख यांच्या घरासह मालमत्तांवर छापे टाकले आहेत.

दरम्यान अनिल देशमुखांच्या घरावरील छापेमारीनंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर दाखल झाले आहेत.