करोनाची ऐशी तैशी, सलमानचा राधे ईद लाच रिलीज होणार

करोना साथीला न जुमानता बॉलीवूड दबंग खान सलमानने मोठा निर्णय घेतला आहे. देशातील सिनेमाघरे अर्धवेळ उघडी राहणार असली तरीही सलमानचा ‘राधे युअर मोस्ट वॉंटेड भाई’ ईद म्हणजे १३ मे रोजी रिलीज केला जाणार असल्याची घोषणा सलमानने बुधवारी केली आहे. याच दिवशी पेपर व्ह्यू नुसार झीप्लेक्स वर सुद्धा काही रक्कम भरून प्रेक्षक हा चित्रपट घरच्या घरी पाहू शकणार आहेत. अनन्या पांडे आणि ईशान खट्टर यांचा ‘खाली पिली’ असाच झीप्लेक्सवर रिलीज केला गेला होता. सलमानच्या राधेचे ट्रेलर गुरुवारी रिलीज होत आहे.

झी स्टुडीओचे सीबीओ शरीक पटेल म्हणाले करोना मुळे सर्व नवीन काही शोधण्यासाठी प्रवृत्त झाले आहेत. झीप्लेक्स बरोबरच राधे ४० ओव्हरसीज मार्केट मध्येही रिलीज होत आहे. ज्या ज्या देशात सिनेमागृहे खुली आहेत तेथे हा चित्रपट रिलीज होईल. ईद रोजी चित्रपट रिलीज झाला नाही तर सलमानच्या चाहत्यांना धोका दिल्यासारखे होणार आहे. पण त्याचवेळी त्यांच्या सुरक्षेचा विचार सुद्धा करायला हवा म्हणून घरबसल्या त्यांना झीप्लेक्स वर या चित्रपटाचा आस्वाद घेता यावा असे ठरविले गेले.

ज्या ४० ओव्हरसीज मार्केट मध्ये हा चित्रपट रिलीज होईल त्यात मिडिल ईस्ट, नॉर्थ अमेरिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, सिंगापूर, युरोप देशांचा समावेश आहे. इंग्लंड मध्ये गेल्या वर्षीच्या लॉक डाऊन नंतर चित्रपट गृहात रिलीज होणारा राधे पहिलाच चित्रपट आहे.