कोरोनाचे भयावह वास्तव ! राज्यात आज ६२,०९७ कोरोनाबाधितांची नोंद, तर ५१९ मृत्यू


मुंबई: नव्या कोरोनाबाधितांची राज्यात वेगवान वाढ होत असून गेल्या २४ तासांत राज्यात ६२ हजार ०९७ नव्या कोरोनाबाधितांचे निदान झाले आहे. ही संख्या काल ५८ हजार ९२४ एवढी होती. कालच्या तुलनेत आज काहीशी वाढ झाली असून हा फरक ३ हजार १७३ एवढा आहे. त्याचबरोबर मागील २४ तासांमध्ये एकूण ५४ हजार २२४ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले. ही संख्या काल ५२ हजार ४१२ एवढी होती. याबरोबरच राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ६ लाख ८३ हजार ८५६ वर जाऊन पोहचली आहे.

राज्यात आज एकूण ५१९ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. ही संख्या काल ३५१ एवढी होती. सध्या राज्यातील मृत्यूदर १.५५ टक्के एवढा आहे. तसेच राज्यात आज ५४ हजार २२४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, तर आतापर्यंत एकूण ३२ लाख १३ हजार ४६४ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८१.१४ टक्क्यांवर आले आहे.

राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ६ लाख ८३ हजार ८५६ एवढी झाली आहे. सर्वाधिक १ लाख १७ हजार ५२१ एवढे रुग्ण पुणे जिल्ह्यात आहेत. मुंबई महानगरपालिका हद्दीत हा आकडा ८२ हजार ६७१ एवढा आहे. ठाणे जिल्ह्यात सध्या ८० हजार ४४० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर नागपूर जिल्ह्यात ही संख्या ७८ हजार ४८४ एवढी झाली आहे. नाशिकमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या ४४ हजार २७९ एवढी आहे.

तसेच अहमदनगरमध्ये २१ हजार ६३४ तर औरंगाबादमध्ये १४ हजार ७७९, ही संख्या नांदेडमध्ये १३ हजार २३३ एवढी आहे. त्याचबरोबर जळगावमध्ये १३ हजार ४२५, तसेच तर रायगडमध्ये एकूण १३ हजार २७९ एवढे सक्रिय रुग्ण आहेत. ही संख्या अमरावतीत ५ हजार ८९३, तर, कोल्हापुरात सक्रिय रुग्णांची संख्या ५ हजार ०५७ एवढी आहे. राज्यात सर्वात जास्त सक्रिय रुग्णांची संख्या पुण्यात आहे. तर, सर्वात कमी सक्रिय रुग्णांची संख्या बुलडाणा जिल्ह्यात आहे. येथे सक्रिय रुग्णांची संख्या १ हजार ०७४ एवढी आहे.