आईच्या उपचारासाठी मदत करणाऱ्या सलमान खानचे राखी सावंतने मानले आभार


मागील बऱ्याच दिवसांपासून आपल्या आईची बॉलीवूडची ड्रामा क्वीन अशी ओळख असणाऱ्या राखी सावंत काळजी घेत आहे. राखीच्या आईला कॅन्सर झाला आहे. आईच्या उपचारासाठी पैसे जमा करता यावे यासाठी राखीने बिग बॉसच्या घरात प्रवेश केला होता. पण आता राखीची चिंता नाहीशी कमी होणार आहे. कारण तिच्या आईवर लवकरच एक शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. राखीने रुग्णालयातून नुकताच एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यात राखी आणि तिची आई अभिनेता सलमान खानचे आभार मानताना दिसत आहेत.


आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर राखी सावंतने दोन व्हिडीओ पोस्ट केले आहेत. एका व्हिडीओमध्ये ती मास्क लावून आपल्या आईजवळ उभी आहे आणि यात तिची आई बेडवर दिसत आहे. राखी यामध्ये म्हणत आहे, माझ्या आईवर लवकरच शस्त्रक्रिया होणार आहे. माझ्या आईवर ही शस्त्रक्रिया डॉ. संजय शर्मा करणार आहेत. तसेच ती आईला म्हणते तुला आता घाबरायची अजिबात गरज नाही. डॉक्टर तुझा कॅन्सर पूर्ण बरा करणार आहेत. त्यामुळे तू अजिबात काळजी करू नको.


त्यांनतर आपल्या आईला राखी विचारते सलमान खानबद्दल काय बोलशील? यावर आई म्हणते सलमानने आपली त्यावेळी मदत केली, ज्यावेळी आपल्याला मदतीची सर्वात जास्त गरज होती. आणि सलमानला आशीर्वाद देते. तसेच सलमान खान, सोहेल खानसोबत संपूर्ण कुटुंबाचे आभारही व्यक्त करते. हा व्हिडीओ पोस्ट करत राखी सावंतने देवाचे आणि सलमान खानचे आभार व्यक्त केले आहेत. तसेच राखी सावंतने एक दुसरा व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यात राखीच्या आईला ऑपरेशन साठी घेऊन जात आहेत. आणि ती आपल्या आईची हिम्मत वाढवत आहे. तिला आधार देत आहे.