कंगनाने उडवली महाराष्ट्रातील लॉकडाऊनची खिल्ली


महाराष्ट्रात लागून करण्यात आलेल्या लॉकडाऊनची अभिनेत्री कंगना राणावतने खिल्ली उडवली आहे. तिने एक फोटो शेअर करत महाराष्ट्रातील सद्यस्थितीत असलेल्या लॉकडाऊनची चेष्टा केली आहे. शेअर केलेल्या या फोटोतून कंगनाने महाराष्ट्रातील लॉकडाऊनची नेमकी स्थिती काय आहे याचे वास्तव मांडण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचबरोबर लॉकडाऊनचा नेमका अर्थ काय हे सांगितले आहे.


आपण सगळे पाहत आहोत की, कोरोना महामारी विरोधात संपूर्ण जग झगडत आहे. कोरोनाची दुसरी लाट देशभरात पसरली आहे. अशा परिस्थितीत देशातील काही भागात संचारबंदी करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. हे रोखण्यासाठी 15 दिवसांचा लॉकडाऊन करण्यात आला आहे.

एक फोटो कंगनाने शेअर केला आहे. ज्यामध्ये दरवाजावर टाळे लावण्यात आले असले तरी चारही बाजूंनी मोकळे आहे. एकही भींत नाही. या फोटोची तुलना तिने महाराष्ट्रातील लॉकडाऊनसोबत केली आहे. कंगनाच्या पोस्टवर नेटकरी देखील प्रतिक्रिया देत आहेत.