नीरव मोदीच्या प्रत्यापर्णाला ब्रिटन सरकारची अखेर मंजुरी


इग्लंड : हजारो कोटींच्या पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी हिरे व्यापारी नीरव मोदीच्या प्रत्यापर्णाला ब्रिटन सरकारच्या गृहमंत्र्यांनी मंजुरी दिल्याची माहिती सीबीआय अधिकाऱ्यांनी दिली आहे. पंजाब नॅशनल बँकसोबत तब्बल 2 अरब डॉलरच्या फसवणुकीचा फरार नीरव मोदीवर आरोप आहे. ब्रिटन सरकारच्या गृहमंत्र्यांनी भारतातून झालेल्या फरार हिरे व्यापारी नीरव मोदी याच्या प्रत्यार्पणाला मंजुरी दिली आहे. पंजाब नॅशनल बँकेला नीरव मोदीने 13 हजार 570 कोटी रुपयांचा चुना लावला होता.

19 मार्च, 2019 मध्ये अटकेनंतर त्याला जामीन दिला जात नसल्यामुळे तो वंडसवर्थ तुरुंगात बंद आहे. यादरम्यान तो अजूनही ब्रिटेनच्या उच्च न्यायालयासमोर वेस्टमिस्टंर मॅजिस्ट्रेट न्यायालयाच्या आदेशाविरोधात अपील करू शकतो, हा पर्याय अद्यापही त्याच्याजवळ उपलब्ध असल्याचे सांगितले जात आहे. पंजाब नॅशनल बँकेला (पीएनबी) १४ हजार कोटींचा चुना लावून नीरव मोदी लंडनमध्ये पळून गेला. मुंबईतील विशेष न्यायालयाने फरारी आर्थिक गुन्हेगार म्हणून घोषित केले होते.