‘ब्रेक द चेन’ अंतर्गत पुण्यात काय राहणार सुरू आणि काय बंद


पुणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ‘ब्रेक द चेन’ म्हणत राज्यात कडक निर्बंध नियमावलींची घोषणा केली आहे. राज्यांत १४ एप्रिल ते १ मे या कालावधीत कडक निर्बंध लावण्यात आल्यानंतर पुणेकरांसाठी नवीन नियमावली पुणे महापालिकेने देखील जाहीर केली आहे.

पुढील १५ दिवस राज्यात कलम १४४ कलम लागू राहणार आहे. त्यानुसार संचारबंदीचे आदेश राज्यात लागू असणार आहे. पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी याच पार्श्वभूमीवर याबाबतचे आदेश काढले आहे. तसेच या नियमांचे उल्लंघन केल्यास दंडात्मक, कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

पुण्यात हे राहणार सुरू..

  • सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद होणार नाही. अत्यावश्यक सेवांसाठी वाहतुकीचा वापर सुरू राहणार
  • वैद्यकीय सेवा, वाहतूक सप्लाय चेन, लस उत्पादक आणि वाहतूक करणारे, मास्क, जंतूनाशक उत्पादक आणि वितरक, वैद्यकीय कच्चा माल निर्मिती करणारे कर्मचारी, जनावरांचे दवाखान्यातील कर्मचारी, शीतगृहे, वेअर हाऊसिंग, बस, ऑटो
  • विविध देशांची राजनैतिक कार्यालये, पावसाळी कामे सुरु राहतील
  • सर्व बँका, सेबी, सेबीने मान्यता दिलेली कार्यालये, दूरसंचार सेवा, ई-कॉमर्स, अधिस्विकृतीधारक पत्रकार
  • पेट्रोल पंप सुरु राहतील
  • शासकीय आणि खासगी सुरक्षा मंडळे, आयटी सेवा सुरू राहणार आहेत.
  • हॉटेल्स रेस्टॉरंट्सवर पूर्वीप्रमाणेच निर्बंध कायम असून, टेक अवे, होम डिलिव्हरी सेवा सुरू राहतील. रस्त्यावरील खाद्य विक्रेत्यांनाही परवानगी देण्यात आली असून, त्यांनीही पार्सल व्यवस्थाच
  • रुग्णालये डायग्नोस्टिक सेंटर, क्लिनिक, वैद्यकीय, विमा कार्यालय
  • फार्मसी फार्मासिटिकल कंपनी आणि इतर वैद्यकीय तसेच आरोग्य सेवा
  • किराणा दुकाने भाजीपाला डेअरी बेकरी मिठाई आणि खाद्यपदार्थांचे दुकाने
  • उत्पादन क्षेत्रात ऑक्सिजन प्रोड्युसर कंपन्या, बांधकाम कर्मचाऱ्यांची निवासी सोय, डे केअर.

पुण्यात हे बंद राहणार:

  • सर्व उद्याने, मैदाने
  • सर्व प्रकारची दुकाने, मार्केट आणि मॉल
  • सर्व खासगी कार्यालये
  • सिनेमागृह, नाट्यगृह, जिम क्लब, स्विमिंग पूल आणि क्रीडा संकुल
  • हॉटेल, रेस्टॉरंट बार, फूड कोर्ट बंद
  • सर्व धार्मिक स्थळे
  • ब्युटी पार्लर, सलून , स्पा, केशकर्तनालय
  • प्राथमिक माध्यमिक शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था